Ladki Bahuli Hoti Mazi Lyrics | लाडकी बाहुली - इंदिरा संत
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण Ladki Bahuli Hoti Mazi Lyrics बघणार आहोत. शांता शेळके यांनी ही कविता लिहिलेली आहे. लहान मुलीच्या भाव विश्वाचे सुंदर रित्या वर्णन करणारी ही कविता आहे. चला तर मग बघूया लाडकी बाहुली कविता -
Ladki Bahuli Hoti Mazi Lyrics
लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना शोधून दुसऱ्या लाख
किती गोरी गोरी ... गाल गुलाबच फुलले
हासती केस ते सुंदर काळे काळे ...
झाकती उघडती निळे हसरे डोळे
अन ओठ जसे की आताच खुदकन हसले
अंगात शोभला झगा रेशमी लाल
केसांवर फुलले लाल फितीचे फुल
कितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी
पण तीच सोनुली फार मला आवडली
मी तिजसह गेले माळावर खेळाया
मी लपूनी म्हणते, साई सुट्य हो या या !!!!
किती शोध शोधली कुठे न परी ती दिसली
परतली घरी मी होऊन हिरमुसलेली
वाटले सारखे जावे त्याच ठिकाणी
शोधूनी पहावे पुन्हा पुन्हा ती चिमणी
जाणार कशी पण संतत पाऊस धार
फळ मुळी न तिजला वारा झोंबे फार
तिच्यासाठी रडले रात्रंदिन मी बाई
किती खेळ भोवती हात लावला नाही
स्वप्नात तिने मम रोज एकदा यावे
हलवून मला हळू माळावरती न्यावे
पाऊस उघडता गेले माळावरती
गवतावर ओल्या मजला सापडली ती !!!!
कुणी गेली होती गाय तुडवणी तिजला
पाहून दशा... रडूच आले मजला
मैत्रिणी म्हणाल्या, काय आहा हे ध्यान
केसांच्या झिपऱ्या रंगही गेला उडून
पण आवडली ती तशीच मजला राणी
लाडकी बाहुली माझी - माझी म्हणूनी !!!!!
- शांता शेळके
⁘―⁘⁘―⁘⁘―⁘⁘―⁘⁘―⁘⁘―⁘⁘―⁘⁘―⁘⁘―⁘⁘―⁘⁘―⁘
हे पण नक्की वाचा 👇👇👇
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
लाडकी बाहुली होती माझी एक ही कविता शान्ता शेळके यांनी लिहिली आहे. इंदिरा संतांची नाही. कृपया दुरुस्ती करावी
उत्तर द्याहटवातुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा