Header Ads

Aala Aala Paus Aala Lyrics | आला आला पाउस आला



नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये तुम्हाला Aala Aala Paus Aala Lyrics वाचायला मिळणार आहे.


Aala Aala Paus Aala Lyrics


आला आला पाउस आलाबघा बघा हो आला आला
पाउस आला ….. पाउस आला

काळ्या काळ्या मेघांमधुनी,
शुभ्र कशा या धारा झरती
अवतीभवती झुलू लागल्या जलधारांच्या माळा

हसली झाडे हसली पाने
फुले पाखरे गाती गाणे
ओल्या ओल्या मातीचाही श्वास सुगंधी झाला

धरणी दिसते प्रसन्न सारी
पागोळ्यांची नक्षी न्यारी
फांदीफांदीवरी थाटली थेंबांची ही शाळा

लेवुनिया थेंबांचे मोती
तरारली गवताची पाती
वसुंधरेने पांघरिला जणु हिरवा हिरवा शेला



You May Also Like:



तर मित्रांनो आज आपण Aala Aala Paus Aala Lyrics बघितली . अश्याच बालगीत सबंधित पोस्ट वाचण्यासाठी साठी True Marathi Lyrics पुन्हा भेट नक्की दया .


धन्यवाद !!!!!!!!



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.