Header Ads

रानपाखरा कविता इयत्ता तिसरी | Ranpakhara Marathi Kavita Third Standard


नमस्कार, या पोस्टमध्ये तुम्हाला इयत्ता तिसरी च्या मराठी पाठ्य पुस्तकातील रानपाखरा ही कविता वाचायला मिळेल. गोपीनाथ यांनी ही कविता लिहिलेली आहे. चला तर मग बघूया रानपाखरा कविता इयत्ता तिसरी -

रानपाखरा कविता इयत्ता तिसरी

रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा
गाणे गाऊन मला उठवीसी मित्र जिवाचा खरा

शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी
सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी
पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला
अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला

रात्र संपता डोंगर चढूनी वर येतो भास्कर
तुम्ही त्यांच्या संगे एसी गात गात सुस्वर
तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी
नेशील का मज तुझ्या बिऱ्हाडी बसवनी पंखावरी ?

माय तुझी येईल, सूर्य ही येईल भेटायला
मजाच होईल सख्या पाखरा नेई एकदा मला
रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा
गाणे गाऊन मला उठवीसी मित्र जिवाचा खरा

- गोपीनाथ

―⸭⸭―⸭⸭―⸭⸭―⸭⸭―⸭⸭―⸭⸭―⸭⸭―⸭⸭―⸭⸭―


हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज आपण या पोस्टमध्ये रानपाखरा कविता इयत्ता तिसरी बघितली. अधिक मराठी कवितांसाठी ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.