Header Ads

May Marathi Kavita | इयत्ता पाचवीची माय मराठी कविता



या पोस्ट मध्ये तुम्हाला May Marathi Kavita वाचायला मिळेल . सोबतच त्याचा अर्थ सुद्धा खाली दिलेला आहे . तर माय मराठी ही कविता इयत्ता पाचवी ची बालभारती (मराठी ) या पुस्तकामधील आहे . या कवितेच्या संजीवनी मराठे या कवियत्री आहेत . या मध्ये कवियत्रीने मराठी भाषेचा महिमा सांगितलेलाआहे .


May Marathi Kavita | माय मराठी कविता

माय मराठी! तुझिया पायी तनमनधन मी वाहियले,
तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.

कष्टामधली तुझौच गोडी चाखायाची मज आई,
मला आवडे तुझा विस्रावा, तुझीच निर्भर अंगाई.

तुझे झरे अन्‌ तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा,
हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा.

तुझिया अंकी लोळण घेते, बागडते,
तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते.

तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी,
जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी.

तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची,
अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची.

तुझियासाठी वात होउनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझया स्वरूपा मिळते मी.



कवितेचा अर्थ

हे माय -- तुज़्य पायाशी मि माझे तन -मन -धन वाहिले आहे . तुझ्या नावामध्ये आणि तुझ्या सोबतीमध्ये मी अखंड रंगून गेलो आहे .मला मराठी भाषेचा अभिमान आहे .

हे आई मला तुझ्यासाठी कष्ट घ्यायला आवडते. तुझ्या सहवासमध्ये रहायला आवडते आणि तुझे अंगाईगीत पण मला आवडते .

तुझ्या जमिनीवरील पक्षी आणि इथले लोक हाल हवेहवेसे वाटतात . माय मराठी भाषेमध्ये व्यक्त केलेला राग , समाधान हे सुद्धा मला हवेहवेसे वाटतात .

तुझ्या या प्रदेशातच खेळायला , बागडायला मला आवडते . तसेच मनातील कल्पना मराठीमधूनच व्यक्त करायला मला आवडते .

हे मराठी माय !!!!!! मला तुझ्यासोबतच चालणे , बोलणे आवडते. मराठी संस्कृती वर माझे खूप प्रेम आहे . जे मनात आहे तेच बोलणे हीच शिकवण तू मला देतेस .

माय मराठी भाषेमधील शब्द , त्यांचे अर्थ आणि त्यामधील भावनांची सुंदरता यांची मोहनमाळ मी गुंफत बसले आहे .

तुझ्यासाठी मी नेहमी कष्ट करत राहील . आणि तुझ्याशी नेहमी एकरूप राहील .मराठी चा अभिमान नेहमी बाळगेल असे कवियत्री इथे म्हणत आहेत .




You May Also Like 👇👇👇


मित्रांनो या पोस्टमध्येआपण May Marathi Kavita बघितली सोबतच त्याचा अर्थ पण समजून घेतला. मराठी कविता आणि गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics  सोबत जोडलेले राहा.


धन्यवाद !!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.