Header Ads

Small Poem In Marathi On Mother | आई वर छोट्या कविता संग्रह 


नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण Small Poem In Marathi On Mother बघणार आहोत. इथे आई या विषयावरील छोट्या कविता तुम्हाला वाचायला मिळतील.

Small Poem In Marathi On Mother


बाई पणाचं दुखणं जिव्हारी लागलं
की मग अंगी असलेलं आईपण
तिला सांभाळतं खंबीरपणे उभ करत
कोणतेही धनुष्य पेलण्याच बळ
तिच्या अंगी देत...
इतकी ताकद असते
या आईपणात ...!!!

-प्रियंका पाटील



जिच्या सोबत असताना
दुःख जाणवत नसते
ते सुंदर जग
म्हणजे आई असते ..
- मनस्विनी



जगी माऊली सारखे कोण आहे
जिथे जन्मांतरीचे ऋण आहे
असे ऋण हे ज्यास व्याज नाही
त्या ऋणाविण जीवनास साज नाही
जिच्या सारखे कौतुके बोल नाहीत
जिच्या यातनांना जगी तोड नाही
तिचे नाव जगात आई ...
आई एवढे कशालाच मोल नाही ...



सढळ हाताने देत गेलीस
मागितले काहीच नाही
हसत मुखाने केलास
जगावेगळा व्यवहार
कळल्या ना तुझ्या वेदना
कळली ना खंत



कळीत मिटलेलं फुल आणि
पोटात जपलेल्या मुल उमलत
जाताना पाहण्याचं भाग्य फक्त
झाडाला आणि आईला मिळतं



कधीतरी आपल्या 
आईच्या डोळ्यात बघा
तो एक असा आरसा आहे
ज्यात तुम्ही कधीच मोठे 
दिसणार नाहीत !!!



माझी मायेचा झरा
दिला तिने जीवनाचा आधार
ठेच लागता माझ्या पायी
वेदना होती तिच्या हृदयी
तेहतिस कोटी देवांमध्ये
श्रेष्ठ मला माझी आई ..



जन्म जो माऊली तुझ्या कुशीत मी घेतला
जग पाहिलेही नव्हते नऊ महिने श्वास
तुझ्या गर्भात मी घेतला ‌....
अलगत बोट धरून तुझ्या कुशीत
संस्कारांचा पाठ मी घेतला ...
जन्म सफल झाले माते
जन्म तुझ्या छायेतून मी घेतला..



आई म्हणजे मंदिराचा उंच कळस ..
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस ....
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी..
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंड पाणी....



आत्मा आणि ईश्वर यांचा
संगम जिथे असतो
असा दिवा जो सतत तुमच्या
मनात तेवत असतो....
आईची माया शब्दात मांडू शकेल
असा कोणीही नाही ....



घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही
जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर
आई हेच शब्द राहतात ... !!!



दुःखाचा डोंगर कोसळलेला असो,
की सुखाचा वर्षाव होत असो,
मनाला चिंतेचा ग्रहण लागणारे
की आठवणीचे तारे लुकलुकत असो
आठवते ती फक्त ' आई '



हळवा दुरावा तुझा
हा जीव कासावीस करतो
तुझ्या मायेच्या सावलीत
स्वर्ग ही फिका पडतो
तुझ्या अंशाचा कण मी
आठवणीत जगतो..
नित्य जन्म तुझ्या कुशीत लाभू दे ..
हेच मागणे मागतो ....

- गणेश पावले



हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज या पोस्टमध्ये आपण Small Poem In Marathi On Mother बघितल्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 
🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.