मैत्रीण कविता मराठी | Maitrin Kavita Marathi Madhun
नमस्कार, या पोस्टमध्ये तुम्हाला मैत्रीण कविता मराठी वाचायला मिळतील. इथे तुम्ही मैत्रिणी या विषयावरील पाच कविता वाचू शकता. चला तर मग बघूया मैत्रीण कविता मराठी मधून -
मैत्रीण कविता मराठी
💓💓💓👬💜👬💜👭💜👬💜💓💓💓
कविता - १
मैत्रीण माझी बिल्लोरी
बूट्टूक लाल चूट्टूक चेरी
मैत्रीण माझी हू का चू
मैत्री माझी मी का तू
मैत्री माझी हट्टी गं
उन्हाळ्याची सुट्टी गं
मैत्रीण माझ्या ओठावरची
कट्टी आणि बट्टी गं
मैत्रीण रुणझुणती पोर
मैत्रीण पुनवेची कोर
मैत्रीण मैत्रीण कानी डूल
मैत्रीण मैत्रीण वेणीत फुल
मैत्रीण मांजा काचेचा
हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रीण
बदामाचे गुढ मैत्रीण
मैत्रीण माझी अशी दिसते
झाडावर कळीत फुलते
ओल्या ओठी हिरमुसते
वेड्या डोळ्यांनी हसते
मैत्रीण माझी फुल गंधी
मैत्रीण माझी स्वच्छंदी
करते जवळी अपरंपार
तरी नेहमी स्पर्शापार
मैत्रीण सारे बोलावे
मैत्रीण कुशीत स्पंदावे
जितके धरले हात सहज
तितकेच सहज सोडावे
मैत्रीण माझी शब्दाआड लपते
हसूनीया म्हणते,
पाण्याला काय चव असते
अन मैत्रीस काय वय असते
मैत्रीण थोडे बोलून थांब
मग प्रश्नांची लागते रांग
दुःख असे का मज मिळते
तुझ्यापाशी जे खुलते
मैत्रीण माझी स्वच्छ दुपार
मैत्रीण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी
मैत्रीण भरले आभाळ
- संदीप खरे
—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—
कविता - २
एक मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास सजावा
तुमच्या सुद्धा खांदा कधीतरी
तिच्या दुःखाने भिजावा
एक मैत्रीण असावी
जिच्याशी निर्माण संवाद व्हावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एकदा अपवाद असावा
एक मैत्रीण असावी
चार चौघात उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून कोण हसावी
एक मैत्रीण असावी ....
- श्रेयस सोनवले
—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—
कविता - ३
आयुष्याच्या पाऊलवाटेवर चालताना
एक तरी मैत्रीण असावी
दिसायला साधी, समजायला सोपी
नी बोलायला सरळ असावी
बोलताना शब्द तोलणारी नसावी
मनातील सारं बोलणारी असावी
शब्द शब्दाला ती रुसणारी नसावी
सहज मनमोकळी हसणारी असावी
आलेल्या दुःखांना कधी कटाळणारी नसावी
आयुष्यातील प्रत्येक क्षण जगणारी असावी
उगीच फुगा धरून ती बसणारी नसावी
थोडी नटखट थोडी गमतीदार असावी
व्यवहाराच्या जगात ती गुरफटलेली नसावी
फक्त मैत्रीचा गोडवा जपणारी असावी
उगीचच निरार्थी प्रशंसा करणारी नसावी
कधी तिखट कधी गोड बोलणारी असावी
एक तुझ्यासारखी मैत्रीण नेहमीच असावी
मी मैत्रीच्या डोंगरावर जावं आणि तिथ तू दिसावी
आयुष्याच्या पाऊलवाटेवर चालताना
तुझ्यासारखी मैत्रीण नेहमीच असावी
—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—
कविता - ४
एक मैत्रीण अशी असावी
आई बनवून डोळ्यातील भावनांना
न बोलताही ओळखणारी असावी
तुमच्या सहित सुख दुःखाला
ती मिठीत भरणारी असावी
एक मैत्रीण अशी असावी
पाठीराखा भाऊ म्हणून तुम्हाला
ती जिवापाड जपणारी असावी
पाठीवर हात ठेवून विश्वासाने
तुम्हाला लढ म्हणणारी असावी
एक मैत्रीण अशी असावी
कडून भांडणाऱ्या रुसणाऱ्या
खोडकर बहिणीसारखी असावी
मनाच्या शिंपल्यातल्या गुपितांना
जपणारी ती राजदार असावी
एक मैत्रीण अशी असावी
कठोर रागीट बापासारखी पण
चूक सांगणारी, सुधारणारी असावी
पण तुम्ही मोडून पडल्यावर
खंबीर आधार बनणारी असावी
एक मैत्रीण अशी असावी
हसल्यावर हसणारी रडल्यावर रडणारी
जिवाभावाची ती मैत्रीणच असावी
तुमच्या बेरंग जीवनात ती
तिच्या अस्तित्वाचे रंग भरणारी असावी
—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—
कविता - ५
एक तरी मैत्रीण अशी असावी
जरी न बघता पुढे गेलो तरी
मागून आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी
वेळ आलीच तर अश्रू ही पूसणारी
स्वतःच्या घशातला घास
आठवणीने काढून ठेवणारी
वेळप्रसंगी आपल्या वेड्या मित्राची
समजूत काढणारी ....
सगळ्यांच्या गलक्यात
आपणास सैरभैर शोधणारी
आपल्या आठवणींन
आपण नसताना व्याकुळ होणारी
परत अशी एक तरी जीवाभावाची मैत्रीण हवी
आपणास मित्र म्हणणारी
—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—⸎—
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज या पोस्टमध्ये आपण मैत्रीण कविता मराठी बघितल्या. तुम्हाला या कविता कशी वाटते आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. अधिक मराठी लिरिक्स आणि कविता वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment