Header Ads

बा निज गडे निज गडे Lyrics | Ba Nij Gade Nij Gade Lyrics



नमस्कार, या पोस्टमध्ये तुम्हाला बा निज गडे निज गडे Lyrics वाचायला मिळतील. हे खूपच जूनं गीत आहे. हे गीत दत्त म्हणजे दत्तात्रय कोंडो घाटे यांनी लिहिलेल आहे. चला तर मग बघूया बां नीज गडे, नीज गडे या गीताचे बोल -

बा निज गडे निज गडे Lyrics

😴😴🙇⏳🌙🌙

निज नीज माझ्या बाळा
बा नीज गडे, नीज गडे लडिवाळा
निज नीज माझ्या बाळा ।। ध्रु० ।।

रवि गेला रे, सोडुनि आकाशाला,
धन जैसे दुर्भाग्याला.
अंधार वसे चोहिंकडे गगनांत,
गरिबाच्या जेविं मनांत.
बघ थकुनि कसा निजला हा इहलोक,
मम आशा जेविं अनेक.
खडबड हे उंदिर करिती,
कण शोधायातें फिरती,
परि अंती निराश होती
लवकरि हेही सोडितील सदनाला,
गणगोत जसे आपणांला ।। १ ।।

बहु दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती,
कुजुनी त्या भोकें पडती.
त्यांमधुनी त्या दाखविती जगताला
दारिद्य्र आपुले बाळा.
हें कळकीचें जीर्ण मोडके दार
कर कर कर वाजे फार
हें दुःखाने कण्हुनि कथी लोकांला
दारिद्य्र आपुले बाळा.
वाहतो फटींतूनि वारा;
सुकवीतो अश्रूधारा
तुज नीज म्हणे सुकुमारा
हा सूर धरी माझ्या या गीताला
निज नीज माझ्या बाळा ॥ २ ॥

जोंवरतीं हें जीर्ण झोपडें अपुलें
दैवानें नाही पडलें,
तोंवरतीं तूं झोप घेत जा बाळा
काळजी पुढे देवाला
जोंवरतीं या कुडीत राहिल प्राण,
तोंवरि तुज संगोपीन
तदनंतरची करूं नको तूं चिंता
नारायण तुजला त्राता.
दारिद्रया चोरिल कोण ?
आकाशा पाडिल कोण ?
दिग्वसना फाडिल कोण?
त्रैलोक्यपती आतां त्राता तुजला
निज नीज माझ्या बाळा ॥ ३ ॥

तुज जन्म दिला, सार्थक नाही केलें,
तुज कांहिं न मी ठेविलें.
तुज कोणि नसे, छाया तुज आकाश;
धन दारिद्र्याची रास;
या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा;
गृह निर्जन रानीं थारा
तुज ज्ञान नसे अज्ञानाविण कांहिं
भिक्षेविण धंदा नाहिं.
तरि सोडुं नको सत्याला,
धन अक्षय तेंच जीवाला,
भावें मज दिनदयाळा,
मग रक्षिल तो करुणासागर तुजला,
निज नीज माझ्या बाळा ॥ ४ ॥

तुज जन्म दिला सार्थक नाही केले
तुज काही न मी ठेविले
तुज कोणी नसे, छाया तुज आकाश
धन दारिद्य्राची रास
या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा
गृह निर्जन रानीं थारा
तुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही
भिक्षेविण धंदा नाही
तरी सोडुं नको सत्याला
धन अक्षय तेच जिवाला
भावें मज दीनदयाळा
मग रक्षिल तो करुणासागर तुजला
निज नीज माझ्या बाळा ॥ ५ ॥


 
हे पण नक्की वाचा 👇👇👇


आज या पोस्टमध्ये आपण बा निज गडे निज गडे Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद  🙏🙏🙏





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.