गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या कविता | Gayi Panyavar Kay Mhanuni Aalya kavita
नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या कविता वाचायला मिळेल. ही खूप जुनी कविता आहे. ही १९७० च्या दशकात बालभारतीच्या पुस्तक पाठ्यपुस्तकात होती. कवी बी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते यांनी ही कविता लिहिलेली आहे.
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या कविता
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या ?
का ग गंगा यमुनाही या मिळाल्या ??
उभय पितरांच्या पित्त चोरीला
कोण माझ्या बोलले गोरटीला
उष्ण बोर वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात
नंदनातील हलविती वल्लरी ला
कोन माझ्या बोलले छबेली ला ??
तुला लंकेच्या पार्वती समान
पाहून या होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
आहा आली हे पहा भिकारीन !!
रत्न सोने मातीत जन्म घेते
राज राजेश्वर निज शिरी धरी ते
कमळ होते पंकात तरी येतो
वसंत श्री सत्कार करायते
पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धुळी संसर्गे रत्न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तुही मजमुळे मग भिकारी ?
नेत्र गोलातून बाल किरणे येती
नाच तेजाचा तव मुख करिती
पाच मानेकर आणखी हिरा मोती
गडे नेत्रा तवलवन तूळो येती
काय येथे भूषणे भूषवावे
विविध वसणे व अधिक शोभावावे
दान सीमा हो जेथ निसर्गाची
काय महती त्या स्थली कृत्रीमाची.
तुला घेईन पोलके मखमलीचे
कुडी मोत्याची फुल सुवर्णाचे
हाऊस बाई पूरविन तुझी सारी
परी आवरी हा प्रलय महाभारी
प्राण ज्यांच्यावर गुंतले सदांचे
कोड किंचित पुरविता नये त्यांचे
सदा बापाचे हृदय कसे होते ?
नये वदता अनुभवी जाणती ते
देव देतो सदगुणी बालकांना
काय म्हणोनी आम्हास करंड्यांना ?
लांब त्यांच्या गावात जाऊनिया
गुढ घेतो हे त्यास पुसोनया
गावी जातो ऐकता त्याचं काली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी कर पारा रेशमाचा
वेद येते मी पोरं अवज्ञाचा
- बी (नारायण मुरलीधर गुप्ते )
तर आज आपण गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या कविता बघितली. तुम्हाला ही कविता माहीत होती का ते मला खाली कमेंट मध्ये सांगा .
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!
Post a Comment