Header Ads

स्वातंत्र्य दिन कविता संग्रह मराठी | Independence kavita In Marathi



नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण स्वातंत्र्य दिन कविता संग्रह मराठी मधून बघणार आहोत. इथे तुम्ही स्वातंत्र्य दिनावर आधारित मराठी कविता वाचू शकता.

    स्वातंत्र्य दिन कविता संग्रह मराठी

    🌸🌸🌸💁💁💁💁🌸🌸🌸

    कविता - १

    १५ ऑगस्ट म्हटलं की तो झंजावात आठवतो
    जो इतिहासाची पाने नटवतो
    मनात क्रांतीचा ज्वाला पेटवतो

    अनेकांच्या बलिदानातून मिळालेले
    हे स्वातंत्र्य आहे
    गुलामगिरी नष्ट करणारे
    मानवतेचे पर्व आहे

    म्हणून बंधू-भगिनींनो
    भारत मातेसाठी संकल्प करू
    मानवतेची कास धरून
    देशाला समृद्ध करू ....

    - हरीश आदावळे

    —⸭—⸭—⸭—⸭—⸭—

    कविता - २

    स्वातंत्र्याची ध्वजा फडकतो
    सूर्य तळपतो प्रगतीचा
    भारत भूमीच्या पराक्रमांना मानाचा मुजरा ..
    या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी
    केला होता त्याग ...

    वंदन करून या तयासी आज
    ठेवणे त्यांच्या बलिदानाची जाण
    करया भारत देशा असंख्य प्रणाम
    त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
    भारत बनला महान ...

    —⸭—⸭—⸭—⸭—⸭—

    कविता - ३

    असा भारत हवाय जिथे
    सगळ्यांची जात भारतीय असेल
    जिथे सगळ्यांचा धर्म, देशप्रेम असेल ,
    उच्च नीच हे सर्व सीमापार असेल,
    इथे प्रत्येकामध्ये नातं असेल .. भारतीयत्वाच !!

    सुख शांती समाधान मिळेल
    प्रत्येक भारतीयाला ....
    आणि शत्रूचा थरकाप उडवतील
    एवढी विचारांना धार असेल

    प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर
    होणारा वार असेल
    जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या
    मनात भारताविषयी आदर असेल.

    चला असा भारत घडवूया ...!!!

    —⸭—⸭—⸭—⸭—⸭—

    कविता - ४

    हुतात्म्यांचे पांग मला अजूनही
    फेडता आलेले नाही
    खरं सांगतो, स्वातंत्र्य अजूनही आम्हाला
    हे स्वातंत्र्य पचवता आलेले नाही ...

    आधी पारतंत्र्यात आम्हाला गुलामीचे धडे दिले..
    नंतर संविधानाने स्वातंत्र्याचे सडे दिले
    तरीही आम्ही व्यवस्थेचे गुलाम झालो
    मत विकून आपल्याच हाताने हलाल झालो
    अजूनही तुझा अर्थच
    आम्हाला लावता आलेला नाही ...
    खरं सांगतो, स्वातंत्र्य अजूनही आम्हाला
    हे स्वातंत्र्य पचवता आलेले नाही ...

    नको.. आम्हाला ग्रंथालय नको
    विद्यापीठे नको, बुद्धीमान घडवणारे
    सामर्थ्यवान पुस्तके नको..
    आम्हाला हवा आहे ते फक्त एक देऊळ
    आणि तुझा जन्म दिवस ...
    भरधाव वेगाने गाडी चालवण्यासाठी
    दारू पिऊन तुझे झेंडे मिरवण्यासाठी ...

    एक सांगतो स्वातंत्र्या ...
    आम्ही स्वातंत्र्य भारताचे सार्वभौम
    असे म्हणताना अजूनही आमच्या 
    स्वाभिमानाला ठेच लागलेली नाही...
    खरं सांगतो, स्वातंत्र्य अजूनही आम्हाला
    हे स्वातंत्र्य पचवता आलेले नाही ...

    एक सीमेवर लढतो आहे,
    एक मातीत राबतो आहे,
    एक देश वाचवतो आहे तर
    एक देश जगवतो आहे

    आम्ही स्वातंत्र्य भारताचे 
    नागरिक काय करतो ?
    तर फक्त अजूनही लाचारीला
    सलाम करतो आहे ...

    एक सांगू स्वातंत्र्या,

    आमच्या घरात येणारे नदीचे, 
    गटाराचे पाणी अजूनही आम्हाला 
    अडवता आलेले नाही....
    खरंच सांगतो, स्वातंत्र्य अजूनही आम्हाला
    हे स्वातंत्र्य पचवता आलेले नाही ...

    कुठे धान्याचे कोठार कुजल्याने सडते आहे
    तर कुठे कुणाचा भुकेने जीव जातो आहे
    देश सोडून जाणाऱ्यांसाठी विमाने आहेत तर
    आपल्याच घरी परतणाऱ्यांसाठी पायदळ रस्ता
    नाही.. नाही आम्ही कुठलाच प्रश्न करणार नाही
    कारण आम्ही आत्मनिर्भर आहे हुशार नाही

    अरे स्वातंत्र्या, तुला समजण्याइतकी अजून 
    आमच्यात अक्कलच आलेली नाही.
    खरंच सांगतो, स्वातंत्र्य अजूनही आम्हाला
    हे स्वातंत्र्य पचवता आलेले नाही ...

    हुतात्म्यांचे पांग मला अजूनही
    फेडता आलेले नाही
    खरं सांगतो, स्वातंत्र्य अजूनही आम्हाला
    हे स्वातंत्र्य पचवता आलेले नाही ...

    - ऋषिकेश पाडर

    —⸭—⸭—⸭—⸭—⸭—

    कविता - ५

    तीन रंगाचा आमूचा तिरंगा
    केशरी, पांढरा अन हिरवा
    नभी फडकत गातो
    पराक्रमाची गाथा !!!!

    चांदी सोने माझा देश
    सुजलाम सुफलाम माझा देश
    गंगा यमुनेच्या माळेचा
    फुलांसारखा माझा देश

    स्वातंत्र्याच्या अफाट समरी
    लढल्या कोटी विभूती
    देहाच्या केल्यास समिधा त्यांनी
    अन प्राणांची आहुती

    तिरंगा आमूचा मान आहे
    पराक्रमाचे गाण आहे
    भारताची शान आहे
    तिरंगा आमचा प्राण आहे

    अनेक जाती धर्म सोबती
    आनंदाने हा राहतो
    देश माझा भारत
    विविधतेत एकता साधतो ...

    —⸭—⸭—⸭—⸭—⸭—


    कविता - ६

    जय भारत देशातुझ्या चरणी
    कोटी कोटी माझे नमन असो
    नाम तुझे विश्वात साऱ्या
    नित्य नित्य हे उच्च वसो

    ही जन्मभूमी ज्या राम कृष्णाची
    त्या धर्म सत्याचे दूत आम्ही
    अन्याय चिरडला ज्या राजांनी
    त्या शंभू शिवांचे सुत आम्ही

    स्वातंत्र्य मिळाले ज्यामुळे
    त्या शूर वीरांना स्मरू आम्ही
    बलिदान प्राण्यांचे दिले जयांनी
    त्या त्यागांना जपू आम्ही

    देशभक्तीची ही अविरत गंगा
    जना जनात ठासून बसो ..
    नाम तुझे विश्वात साऱ्या
    नित्य नित्य हे उच्च वसो ...

    तुझ्या कीर्तीची दिव्य पताका
    विश्वामध्ये फिरवू आम्ही..
    तुझी परंपरा, तुझी संस्कृती
    कणाकणात पेरू आम्ही

    विश्वशांतीचा संदेश जगाला
    पुन्हा नव्याने सांगू आम्ही
    मानवतेचा विराट धर्म वृक्ष
    मना मनात रुजू आम्ही

    जगामध्ये शो शांती ज्योत
    ही लखलखती सदैव दिसो
    नाम तुझे विश्वात साऱ्या
    नित्य हे उंच वसो .....

    जय भारत.. जय भारत ... जय भारत... देशा....

    —⸭—⸭—⸭—⸭—⸭—



    हे पण वाचा 👇👇👇



    तर आज आपण स्वातंत्र्य दिन कविता संग्रह मराठी बघितल्या.

    पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद  
    🙏🙏🙏🙏


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.