उठ मुला उठ मुला कविता | Uth Mula Uth Mula Kavita
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण उठ मुला उठ मुला कविता बघणार आहोत. ही कविता १९७० - ८० च्या दशकामध्ये बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात होती. बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी ही कविता लिहिलेली आहे. यामध्ये आई आपल्या झोपलेल्या मुलाला उठवत आहे. आणि उजाडलेल्या नवीन दिवसाच्या वर्णन ती या कवितेच्या माध्यमातून करत आहे.चला तर मग बघूया उठ मुला ही कविता -
उठ मुला उठ मुला कविता | Marathi
उठ मुला, उठ मुला,
बघ हा अरुणोदय झाला !
किलबिलती बागडती,
झाडावरती पक्षी किती !
फुलांवरी फळांवरी,
पतंग मोदे मजा करी !
उठ मुला, उठ मुला,
बघ हा अरुणोदय झाला !
झटकन बसे, चटकन उठे,
उंच भराऱ्या घेत सुटे !
शितल हा वात पहा,
आळस हरण्या येत अहा !
उठ मुला, उठ मुला,
बघ हा अरुणोदय झाला !
पूर्वेला रवी आला,
मला उठाया कथित तुला !
उठ मुला, उठ मुला,
बघ हा अरुणोदय झाला !
- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे )
⸎ - ⸎ - ⸎ - ⸎
उठ मुला उठ मुला कविता | English
Utha Mulaa Utha Mulaa
Bagha Arunoday Jhaalaa !
Kilbilati Baagadati
JhaadaaVarati Pakshi Kiti !
FulaanVari FalaanVari
Patang Mode Majaa Kari !
Utha Mulaa Utha Mulaa
Bagha Arunoday Jhaalaa !
Jhatakan Base, Chatakan Uthe
Uncha Bahraaryaa Ghet Sute !
Shital Haaa Vaat Pahaa,
Aalas Harnyaa Yet Ahaa !
Utha Mulaa Utha Mulaa
Bagha Arunoday Jhaalaa !
Purvelaa Ravi Aalaa,
Mulaa Uthaayaa Kathit Tulaa !
Utha Mulaa Utha Mulaa
Bagha Arunoday Jhaalaa !
- Baalkavi ( Tryambak Bapuji Thombare )
⸎ - ⸎ - ⸎ - ⸎
हे पण वाचा 👇👇👇
तर आज आपण उठ मुला उठ मुला कविता बघितली. अधिक मराठी कविता वाचण्यासाठी True Marathi Lyrics पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment