खबरदार जर टाच मारुनी कविता | Khabardar Jar Taach Maaruni kavita
नमस्कार या पोस्टमध्ये आपण खबरदार जर टाच मारुनी कविता बघणार आहोत. इ स १९७० - १९८२ मध्ये बालभारती मराठी पाठ्यपुस्तकात इयत्ता पाचवी ला ही कविता होती. वा. भा. पाठक हे या कवितेचे कवी आहेत.
खबरदार जर टाच मारुनी कविता
खबरदार जर टाच मारुनी
जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या !!!
कुण्या गावचे पाटील आपण
कुठे चालला असे
शिवही ओलांडूनी तिरसे
लगान खेचा हा घोडीचा राव
टांग टाकून असे या खंड्या अंगणी
पोर म्हणूनी हसण्यावरी वेळ नका नेऊ
मला का ओळखले हो तुम्ही !!!!
हा मर्द मराठ्यांचा मी बच्चा असे
हे हाडही माझे लेचेपेचे नसे
या न सांगता तुम्ही हिम्मत बाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी
जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या !!!
मळ्यात जाऊन या मोटेचे ते पाणी धरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा
मोठी ज्याच्या मूठ असेही, खडगाची तो बरे
वीर तू समजलास काय रे ?
थोर मारीसी अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी
हे खडगाचे बघ पाते किती चमकते
अनुकुचीदार अति भाल्याचे टोक ते
यापुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर टाच मारुनी
जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या !!!
आपण मोठे दाढीवाले आहा शूर वीर की -
किती ते आम्हाला ठाऊकी !!
तडफ आमच्या शिवबाजीची
तुम्हा माहिती न का ?
दावीता फूशारकी का फुक ?
तुम्हा सारखे असतील किती ,
लोळविले नरमणी आमच्या शिवबाने भर रणी
मी असे इमानी चेला त्यांचे कडे
हुकुमा विन त्यांच्या समजा याचे पुढे
देईन जाऊ मी शूर वीर फाकडे
पुन्हा सांगतो, खबरदार जर टाच मारुनी
जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या !!!
लाल भडकते वदन जाहले बाळाचे मग कसे
स्वार परी मनी हळू का हसे ?
त्या बाळाच्या नयनी चमके पाणी त्वेषामूळे
स्वार परी सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे जणू एक दुसरा तापतो रवी का तर
ऐका शिवबाचे हे स्वर -
आहेस इमानी माझा चेला खरा
चल इनाम घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या, बोल पुन्हा एकदा
खबरदार जर टाच मारुनी
जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या !!!
- वा. भा. पाठक
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज आपण खबरदार जर टाच मारुनी कविता ही कविता बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment