Header Ads

Short Poem In Marathi | छोट्या मराठी कविता


नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये आपण Short Poem In Marathi बघणार आहोत. छोटया मराठी कविता तुम्ही इथे वाचू शकता.


📖📕Short Poem In Marathi📖📕

    पहाटेच्या प्रहरी ...

    चंद्र जरासा लपतो
    ढगांच्या भिंतीमागे
    वारा थांबवितो
    श्रावणाची बासरी

    लपंडाव सावल्यांचा
    रात्रीच्या खेळात
    चांदणे विरते
    पहाटेच्या प्रहरी

    ❖ ❖ ❖ ❖

    जखमांचं देणं

    'आकाशपण' हटता हटत नाही
    माती पण मिटता मिटत नाही
    आकाश मातीच्या या संघर्षात
    माझ्या जखमांचं देणं
    फिटता फिटत नाही

    ❖ ❖ ❖ ❖


    मध्यम वर्गापुढे समस्या

    मध्यमवर्गापुढे समस्या हजार असती
    परंतु त्यातील एक भयानक
    फार उग्र ती
    पिडीत सारे या प्रश्नाने
    धसका जीवा
    .
    .
    .
    .
    .
    .
    चहा कपाने प्यावा अथवा
    बशीत घ्यावा ???

    ❖ ❖ ❖ ❖

    कुणीतरी असेल तर

    डोळे पुसायला कुणीतरी असेल तर
    रुसायला बरं वाटतं ....!!!
    ऐकणारं कुणीतरी असेल तर
    मनातलं बोलायला बरं वाटतं .... !!!
    कौतुक करणारं कुणीतरी असेल तर
    थकेपर्यंत राबायला बरं वाटतं ..... !!!
    नजर काढणारं कुणीतरी असेल तर
    नटायला बरं वाटतं .... !!!
    जीवाला जीव देणारे वाटसरू असतील तर
    मरेपर्यंत चालायला बरं वाटतं ... !!!

    ❖ ❖ ❖ ❖


    कसे

    कसे देऊ दान तुला
    हात माझे रीते रे
    कसे ढाळू अश्रू तरी
    नेत्र झाले कोरडे रे
    कशी काढावी समजूत
    ओठ माझे बंद रे
    कशी येऊ तुज समोर
    पाय साखळदंड रे
    काय बोलू तुज सवे
    शब्द झाले मुके रे

    ❖ ❖ ❖ ❖


    फुल

    आयुष्य जरी एक दिवसाचे
    काम त्याचे लाख मोलाचे
    सुखदुःखात असतो सोबती
    फुलाची ही थोर महती
    घेऊ शिकवण आपण फुलांकडून
    सुखदुःख वाटू सर्व मिळून
    आयुष्य असेल आपलंही सुगंध
    दृढ होतील ऋणानुबंध

    ❖ ❖ ❖ ❖



    खेड्याकडे चला

    खेड्याकडे चला, कोणासाठी कशासाठी ?
    अडाण्यांच्या हाती, जोर काळीभोर काठी
    त्यांच्या पडसावलीत लांडग्यांचा तळ
    शुभ्र स्वार्थासाठी केली माणसं गढूळ
    कोणी मरो तरी यांच्या आसनांचा खेळ
    महात्म्याच्या गाथेखाली पेटविला जाळ
    यांच्या करणीने सत्य छिन्न भिन्न झाले
    भर पावसात उभे गाव ओस झाले

    - ना. धो महानोर

    ❖ ❖ ❖ ❖


    माझ्यातला परमेश्वर

    जमण्यांतून धावणाऱ्या तांबड्या पाण्याशी
    नातं सांगणाऱ्या पांढऱ्या हृदयाच्या गर्दीवर
    माझा विश्वास नाही

    विश्वास आहे तो फक्त
    श्वासातून अंतकरणापर्यंत
    चैतन्य रुपी संचार करणाऱ्या
    माझ्यातल्या परमेश्वरावर

    ❖ ❖ ❖ ❖


    कसे कसे हसायचे

    कसे कसे हसायचे
    हसायचे आहे मला

    हासतच वेड्या जीवा
    थोपटीत थोपटीत
    फूंकायचा आहे दिवा

    हसायचे कुठे आणि केव्हा ?
    कसे आणि कुणापाशी ?
    इथे भोळ्या कळ्यांनाही
    आसवांचा येतो वास ...

    - चिंतामणी त्याम्बाक खानोलकर

    ❖ ❖ ❖ ❖



    हे पण नक्की वाचा 👇👇👇


    तर आज आपण Short Poem In Marathi बघितल्या. तुम्हाला या कविता कशा वाटल्या ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. अधिक मराठी लिरिक्स आणि कविता वाचण्यासाठी True Marathi Lyrics  ला भेट देत राहा.

    पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏🙏


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.