Header Ads

लई दिसानं काना आला गवळण Lyrics | Lai Disan Kana Ala Gavlan


नमस्कार, या पोस्ट मधून आपण लई दिसानं काना आला गवळण Lyrics बघणार आहोत. कृष्णाची खूप सुंदर अशी ही गवळण आहे.

लई दिसानं काना आला गवळण Lyrics

लय दिसान कान्हा आला
लय दिसान काना आला ग
किती सांगू बाई याला ग
लय दिसान कान्हा आला || धृ ||

मी तर घागर घेऊनी शिरी
जात होते मथुरा बाजारी
संशय आला मना, कृष्ण आला घरा
कृष्णा आला ग
लय दिवसान कान्हा आला ग
लय दिसांन कान्हा आला ||१ ||

दही घुसळीत होते मंदिरी,
अवचित आला तुझा मुरारी
संशय आला मना, कृष्ण आला घरा
कृष्णा आला ग
लय दिवसान कान्हा आला ग
लय दिसांन कान्हा आला ||२ ||

जनी म्हणे बासरी हरी
जाच करशी मजला भारी
संशय आला मना, कृष्ण आला घरा
कृष्णा आला ग
लय दिवसान कान्हा आला ग
लय दिसांन कान्हा आला ||३ ||

किती सांगू बाई याला ग
लय दिसान कान्हा आला
लय दिसान कान्हा आला
लय दिसान काना आला ग
लय दिसान कान्हा आला

☘ ☘ ☘ ☘


हे पण नक्की वाचा 👇👇👇


तर आज आपण लई दिसानं काना आला गवळण Lyrics बघितली. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.