शब्द कविता मराठी ( इयत्ता अकरावी ) | Shabd Kavita Marathi Iyatta Akaravi
शब्द कविता मराठी | Marathi
आकांताने हाका घातल्या माझ्या
तेव्हा तेव्हा शब्दच धाऊन आले,
माझ्या निरूत्तर निखाऱ्यांना
माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले.
डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा
शब्दांच्याच उजेडाने हात दिला,
एखादी आठवण आग घेऊनी धावली
तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला ...
चिडून चिडून सांडत होते ऊन
तेव्हाही शब्दांनीच सावली धरली,
दिवसाही दाटायचा अंधार जेव्हा
शब्दांनीच हातात बिजली दिली.
जगू न देणारे काही विसरायचे होते
तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला,
मरणाच्या धारे त सापडलो तेव्हा
शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला
काहीही नव्हते हाती, वाटे स्वतःचीच भीती
तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला
कधी वाऱ्याने टाळले, कधी निवार्यांनी टाळले
तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला
मी भिकारी : मी शब्दांना काय देऊ ?
मी कर्जदार : शब्दांचा कसा उतराई होऊ ?
मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचविले :
जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले.
- यशवंत मनोहर
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- झाडांच्या मनात जाऊ कविता इयत्ता अकरावी
- रंग माझा वेगळा कविता ( इयत्ता बारावी )
- रे थांब जरा आषाढघना कविता (इयत्ता बारावी)
- सुरेश भट कविता (मराठी)
तर आज आपण शब्द कविता मराठी बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment