झाडांच्या मनात जाऊ कविता इयत्ता अकरावी | Zadanchya Manat Jau Kavita
नमस्कार, या पोस्टमध्ये तुम्हाला झाडांच्या मनात जाऊ कविता वाचायला मिळेल. मराठी कुमारभारतीच्या पाठ्यपुस्तकात ही कविता अभ्यासाला आहे. नलेश पाटील हे या कवितेचे कवी आहेत. झाडांच्या मनात ही कविता -
झाडांच्या मनात जाऊ कविता
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ
पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ
बहरात वसंतामधल्या, तो सुर सावळा ऐकत
जातील फुले ही रंगून, जन्माला अत्तर घालत
चल सुराम बरोबर आपण, तो फाया कानी ठेवू
खेळू रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी
हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी
हे भिरभिरणारे तोरण दाराला आपण लावू ...
हे कोणाची रे करणी, डोळ्यात झऱ्याचे पाणी
हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी
गाण्यात ऋतूंच्या आपण चल खेळाळून रे वाहू
पाण्यात उतरूनी मन या खडकावर बसताना
थुई थुई नाच रे पाणी मन दिसते रे हसताना
एक रोप तुषारचे मजा मायेने घाली न्हाऊ
ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता
आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता
हातात अन डूचमळते अन सूर्य लागतो पोहू ..
हे फांदीवरले पक्षी की हंगामांचे साक्षी
झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी
मग तिलाच फुटले पंख, मी त्यांचे झाले काऊ
मानवी स्पर्श ना जेथे, असतील फुले-पाखरे
रानात अशा तू मजला, ईश्वरा जरा टाक रे
मी झाड होऊनी तेथे, पसरून आपूले बाहू
- नलेश पाटील
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज आपण झाडांच्या मनात जाऊ कविता बघितली.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment