रंग माझा वेगळा कविता ( इयत्ता बारावी ) | Rang Majha Vegala Kavita Iyatta Baravi
नमस्कार, या पोस्टमध्ये आपण रंग माझा वेगळा कविता बघणार आहोत. इयत्ता बारावीच्या कुमार भारती मराठी या पाठ्यपुस्तकात ही कविता अभ्यासाला आहे. सुरेश भट हे या कवितेचे कवी आहेत. चला तर मग बघूया रंग माझा वेगळा कविता -
रंग माझा वेगळा कविता ( इयत्ता बारावी )
रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतूनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा !
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे ;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !
राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी ;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !
कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझ्या गळा !
सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा ;
" चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा ! "
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी ;
माझी यासाठी ना माझा पेटण्याचा सोहळा !
- सुरेश भट
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज आपण रंग माझा वेगळा कविता ( इयत्ता बारावी ) बघितली. अधिक मराठी लिरिक्स आणि पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
Post a Comment