Top 10 Navratri Bhajan Lyrics Marathi | Deviche Bhajan Marathi Lyrics
नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Navratri Bhajan Lyrics Marathi वाचायला मिळतील. मित्रानो नवरात्र उत्सव हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवसांमध्ये सगळीकडे भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येते. बहुतेक ठिकाणी देवीच्या घटासमोर जागर, गोंधळ किंवा भजनाचे कार्यक्रम केले जातात. त्यासाठीच या पोस्ट मध्ये मी तुमच्यासाठी काही खास नवरात्री स्पेशल देवीचे भजने आणले आहेत. चला तर मग वळूया देवीच्या भजनांकडे -
1. शालू हिरवा मळवट भरवा
शालू हिरवा मळवट भरवा, वेणीत गाजर घाला
आला ग बाई अंबेचा उत्सव आला || धृ ||
अश्विन मास आला बाई प्रतिपदेचा दिन ,
वाजत गाजत बसविन थाटात आणून
सनई चौघडा वाजतो दारी, गोंधळ मंदिरी घाला
आला ग बाई अंबेचा उत्सव आला
शालू हिरवा मळवट भरवा, वेणीत गाजर घाला
आला ग बाई अंबेचा उत्सव आला || १ ||
हिरवीगर पैठणी ती जरी बुट्टेदार
एकवीरा ती अंबाबाई नेसली भरदार
तांदूळ नारळ खण तो विडा ओटीत आईच्या घाला
आला ग बाई अंबेचा उत्सव आला
शालू हिरवा मळवट भरवा, वेणीत गाजर घाला
आला ग बाई अंबेचा उत्सव आला || २ ||
एकवीरा ती अंबाबाई अमरावतीची शोभा
जनतेच्या कल्याणा सर्व संकटी अंबा
अहंभाव तो सर्व सोडूनि लोटांगण पदी घाला
आला ग बाई अंबेचा उत्सव आला
शालू हिरवा मळवट भरवा, वेणीत गाजर घाला
आला ग बाई अंबेचा उत्सव आला || ३ ||
अज्ञान दासी नमन करिते ऐकून घे ग आई
तव नामाचा मागू जोगवा सदैव सफल होईल
विष्णुदास हा गातो गाणी जीव हा धुंद झाला
आला ग बाई अंबेचा उत्सव आला
शालू हिरवा मळवट भरवा, वेणीत गाजर घाला
आला ग बाई अंबेचा उत्सव आला || ४ ||
2. अंबेचा उत्सव आला या मोठा
नऊवारी साडी न पायाला आळी
पाळण्यावर घेते ती झोका
या या अंबिकेचा उत्सव आला या मोठा || धृ ||
हातात कडे पायात तोडे ,
नथेचा हालतोय झुमका
या अंबिकेचा उत्सव आला या मोठा
नऊवारी साडी न पायाला आळी
पाळण्यावर घेते ती झोका
या या अंबिकेचा उत्सव आला या मोठा || १ ||
कपाळी कुंकू केसात गजरा ,
कानात हालतोय झुमका
या अंबिकेचा उत्सव आला या मोठा
नऊवारी साडी न पायाला आळी
पाळण्यावर घेते ती झोका
या या अंबिकेचा उत्सव आला या मोठा || २ ||
भरजरी साडी अंगात चोळी,
पदराला मारते झटका
या अंबिकेचा उत्सव आला या मोठा
नऊवारी साडी न पायाला आळी
पाळण्यावर घेते ती झोका
या या अंबिकेचा उत्सव आला या मोठा || ३ ||
3. गुण अंबेचे गाऊया
गुण अंबेचे अंबेचे गाऊया
आईचा जोगवा जोगवा मागुया
अंबेचा जोगवा जोगवा मागुया || धृ ||
जोगवा मागेन मोत्याचा, तेल, तांदूळ, मिठा पिठाचा
अंबेच्या दरबारी दरबारी मागुया
माळ कवळ्यांची घालून गळा,
सारे आराधी झाले गोळा
आईच्या नावाने नावाने मागुया
पोत दिवटी घेऊनि हाती भक्त दरबारी नाचती
सोहळा अंबेचा अंबेचा पाहूया
आईचा जोगवा जोगवा मागुया || धृ ||
मंगळवारी शुक्रवारी जोगवा मागें दहा पाच घरी
चरणी अंबेच्या अंबेच्या लोळुया
गुण अंबेचे अंबेचे गाऊया
आईचा जोगवा जोगवा मागुया
अंबेचा जोगवा जोगवा मागुया
4. देखुनि सुंदर प्रेमळ मूर्ती
देखुनि सुंदर प्रेमळ मूर्ती सिंहासनी बसली
सिंहासनी बसली मला हि जगदंबा दिसली || धृ ||
माय उभी हि जगत्जननी राष्ट्राची हि कुलस्वामिनी
महान साधू, अमाप जनता चरणी तुझ्या लागली
मला हि जगदंबा दिसली || १ ||
देखुनि सुंदर प्रेमळ मूर्ती सिंहासनी बसली
सिंहासनी बसली मला हि जगदंबा दिसली
महिमा तव हा कळेना जिवा परी घडेना हातून सेवा
मार्ग कळेना अंतरीचा वेड्यापरी फिरली
मला हि जगदंबा दिसली || २ ||
देखुनि सुंदर प्रेमळ मूर्ती सिंहासनी बसली
सिंहासनी बसली मला हि जगदंबा दिसली
धाव पाव तू आता अंबे तुझ्या भक्ता
शिक्षा देई त्या क्रूरांना व्याकुळ बहू झाली
मला हि जगदंबा दिसली || ३ ||
देखुनि सुंदर प्रेमळ मूर्ती सिंहासनी बसली
सिंहासनी बसली मला हि जगदंबा दिसली
ती राणी देखणी माय भवानी, अष्टभुजा ती नारायणी
अशी वाचणे तू ठेवावी भक्ताला पावली
मला हि जगदंबा दिसली || ४ ||
देखुनि सुंदर प्रेमळ मूर्ती सिंहासनी बसली
सिंहासनी बसली मला हि जगदंबा दिसली
ऐशी ऐकून करून वाणी सत्वर धाव जगात जननी
आत्मे म्हणवोनि नाभोवाणी कानी मंत्र पडली
मला हि जगदंबा दिसली || ५ ||
देखुनि सुंदर प्रेमळ मूर्ती सिंहासनी बसली
सिंहासनी बसली मला हि जगदंबा दिसली
5. जगदंबा देवीचे नवरात्र विशेष भजन
आई अंबे जगदंबे तझी हौस पुरवीन
तुझी पालखी गावात मिरवीन || धृ ||
पहिले पूजिले , पूजिले तुळजापूर
भग मारिले, मारिले महिषासुर
हळदी कुंकू तुला मी वाहीन
तुझी पालखी गावात मिरवीन || १ ||
नऊ दिवसाचे, दिवसाचे नवरात्र
घरी दुर्गाचे घाट मी मांडीन
हार फुलांचा तुला मी वाहीन
तुझी पालखी गावात मिरवीन || २ ||
आठ दिवसांच्या, दिवसांच्या मंगळवारी
तुझा उपवास करिन भारी
तूझी वाटी मी श्रद्धेने भरीन
तुझी पालखी गावात मिरवीन || ३ ||
आठ दिवसांच्या, दिवसांच्या शुक्रवारी
भक्त येतील तुझ्या दारी
तुझा जोगवा जोगवा मी मागेन
तुझी पालखी गावात मिरवीन || ४ ||
आई अंबे जगदंबे तझी हौस पुरवीन
तुझी पालखी गावात मिरवीन
6. खेळ रंगला रंगला नवरात्रीचा छान
खेळ रंगला रंगला नवरात्रीचा छान (2times)
फुगडी खेळते खेळते कोण कोण (2times)
फुगडी खेळते खेळते कोण कोण || धृ ||
कोल्हापूरची लक्ष्मी ही आली (2times)
अमरावतीची आंबा ही आली (2times)
छम छम वाजती हो .... पैंजण पायात
फुगडी खेळते खेळते कोण कोण || १ || (2times)
खेळ रंगला रंगला नवरात्रीचा छान
फुगडी खेळते खेळते कोण कोण
फुगडी खेळते खेळते कोण कोण
तुळजापूरची भवानी आली (2times)
माहूर गडाची रेणुका आली (2times)
चुडा वाजते हो .... हातात खणं खणं
फुगडी खेळते खेळते कोण कोण || २ || (2times)
खेळ रंगला रंगला नवरात्रीचा छान
फुगडी खेळते खेळते कोण कोण
फुगडी खेळते खेळते कोण कोण
आली सप्तशृंगी वणीची आली (2times)
आली एकवीरा कारल्याची आली (2times)
एकमेकींना हो बघती कौतुकाने
फुगडी खेळते खेळते कोण कोण || ३ || (2times)
खेळ रंगला रंगला नवरात्रीचा छान
फुगडी खेळते खेळते कोण कोण
फुगडी खेळते खेळते कोण कोण
चंद्रपूरची कालिका ही आली (2times)
फुगडीला या शोभा हि आली (2times)
गोंधळ घातला हो .... वाजे संबळ तुन तुन
फुगडी खेळते खेळते कोण कोण || ४ || (2times)
खेळ रंगला रंगला नवरात्रीचा छान
फुगडी खेळते खेळते कोण कोण
फुगडी खेळते खेळते कोण कोण
7. माझी अंबिका सत्वाची
माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात
वाट बघते भक्तांची तुळजापूरच्या घाटात || धृ ||
आली पुनवेची रात पडलं चांदणं डोंगरात
दिवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात
गेल्या कवड्यांच्या माळा घेऊन परडी हातात
वाट बघते भक्तांची तुळजापूरच्या घाटात || १ ||
हळदी कुंकाच लेन तिला नाही त्याची वाण
साडी चोळीचा मान देती अंबाला नेमानं
सडा पडलाय कुंकाचा त्या बाजारपेठांत
वाट बघते भक्तांची तुळजापूरच्या घाटात || २ ||
गाय मुखात न्हाऊन केस मोकळे सोडून
आली अंबिका चालून भाळी मळवट भरून
येई हाकेला धावून नाही भेदभाव पोटात
वाट बघते भक्तांची तुळजापूरच्या घाटात || ३ ||
वारा गार गार सुटलाय काटा अंगावर फुटलाय
युद्ध कपूर पेटलाय सारा सुगंध उठलाय
माळा सुचेना काही बाई या थंडीच्या लाटांत
वाट बघते भक्तांची तुळजापूरच्या घाटात || ४ ||
गाडी चालली घुंगराची वाट लागलं डोंगराची
ओढ मनात अंबाची केली तयारी जत्रेची
बंधू छगन येईल ग त्या जत्रच्या नेटात
वाट बघते भक्तांची तुळजापूरच्या घाटात || ५ ||
माझी अंबिका सत्वाची उभी राहून थाटात
वाट बघते भक्तांची तुळजापूरच्या घाटात
8. कुंकवाच्या मनासाठी झाली बावरी
कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी
पोत खेळताना अंबा पदर सावरी || धृ ||
लांब लांब केस तिने सोडले धरणीला
न्हाऊ घातले मी अंबा मातेला
झांज हलकी वाजे बाई हिरव्या डोंगरी
पोत खेळताना अंबा पदर सावरी || १ ||
कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी
पोत खेळताना अंबा पदर सावरी
हळदी कुंकवाने अंबा झाली लालेलाल
झांज संबळ वाजते भजनाच्या तालात
अंगामध्ये रसरसून आली सवारी
पोत खेळताना अंबा पदर सावरी || २ ||
कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी
पोत खेळताना अंबा पदर सावरी
एका हाती पोत दुसऱ्या हाती परडी
चोळीवर खाडी अंबा नेसली ग साडी
जोडीला मी देते बाई पण सुपारी
पोत खेळताना अंबा पदर सावरी || ३ ||
कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी
पोत खेळताना अंबा पदर सावरी
कपरच्या ज्योती बाई लावल्या भक्तांनी
आशीर्वाद दिला अंबा मातेनी
छबिना चाले बाई अंबेच्या दारी
पोत खेळताना अंबा पदर सावरी || ४ ||
कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी
पोत खेळताना अंबा पदर सावरी
9. येऊ कशी कशी मी भजनाला
येऊ कशी कशी मी भजनाला हो
येऊ कशी कशी मी भजनाला
रिकामपण नाही माझ्या हाताला हो
येऊ कशी कशी मी भजनाला || धृ ||
सकाळी उठून चहाची घाई
डब्ब्यात पहाटे पत्तीच नाही
मुलं चालली शाळेला हो
येऊ कशी कशी मी भजनाला || १ ||
बघता बघता वाजले आठ
कपाटात साड्या तीनशे आठ
लागली लाच शोधायला हो
येऊ कशी कशी मी भजनाला || २ ||
बघत बघता वाजले अकरा
भाजी पाल्याचा सर्व पसारा
लागली भाजी शोधायला हो
येऊ कशी कशी मी भजनाला || ३ ||
बघता बघता वाजले दोन
मैत्रिणीचा आला फोन
लागली गप्पा मारायला हो
येऊ कशी कशी मी भजनाला || ४ ||
म्हातारपणात झोपच नाही
लेक सून बोलत नाही
लागली मंदिर शोधायला हो
येऊ कशी कशी मी भजनाला || ५ ||
म्हातारपणाचा वय झालं
देवघर्च बोलावं आलं
लागले डोळे फिरायला हो
येऊ कशी कशी मी भजनाला || ६ ||
10. रेणुका मातेचे भजन
अवतार आईचा आहे या देवीचा
हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा || धृ ||
या देवीचा महिमा थोर
तिन्ही लोकांत अपरंपार
दृष्टांत आईचा रेणुका देवीचा
हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा || १ ||
अवतार आईचा आहे या देवीचा
हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा
भक्ताच्या हाकेला धावसी लवकर
साडेतीन शक्तिपीठे तुझा हा दरबार
वध हा दैत्याचा महिषासुर नावाचा
हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा || २ ||
अवतार आईचा आहे या देवीचा
हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा
येति हो भक्त संकट निवारी नवरात्रात आई तुझीच वारी
वर त्या भक्तांचा पुरवी क्षणाचा
हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा || ३ ||
अवतार आईचा आहे या देवीचा
हातात हिरवा चुडा हो माझ्या माहूरच्या आईचा
हे पण वाचा :
- देवीचे भजन मराठी Lyrics
- Lakh Padla Prakash Lyrics
- Mitha Pithacha Jogwa Lyrics
- Sarva Mangala Mangalye Mantra In Marathi
- नवरात्रीनिमित्त स्पेशल देवीची भजने
मित्रानो , आज आपण Navratri Bhajan Lyrics Marathi बघितले. तर तुम्हाला हि भजने कशी वाटली ते मला कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर कोणत्या गाण्याचे किंवा भजनाचे लिरिक्स पाहिजे असेल तर ते पण मला सांगा. अन्य भक्ती संबंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!!!
Post a Comment