पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात Lyrics | Aai Ambabai Bhaktigeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात Lyrics बघणार आहोत.
________________________________
पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात Lyrics
पालखी निघाली आईची
तूळजापुराच्या घाटात
हिरवं पातळ नेसली
न आई चालली थाटात || धृ ||
यात्रा भरलीया खास वर शोभत आकाश
पडलं टिपूर चांदणं सारा पडला प्रकाश
आंघोळ घालाया देवीला दही दूध ठेवलं माठात
हिरवं पातळ नेसली....|| १ ||
चोळी पातळाचा मान भक्त देती आनंदान
जाती आईच गुण गाणं सारा विसरून भान
पुरणपोळीचा निवद ठेवीला चांदीच्या ताटात
हिरवं पातळ नेसली....|| १ ||
भक्त भक्तांच्या हो टोळ्या
त्यात आराधनी भोळ्या
आल्या आईच्या दर्शना
किती किती लेकुरवाळ्या
आई पाहते भक्ताला
घाट शिळ्याच्या वाटात
हिरवं पातळ नेसली....|| २ ||
पालखी निघाली आईची
तूळजापुराच्या घाटात
हिरवं पातळ नेसली
न आई चालली थाटात ||
* * * * * *
____________________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
________________________________
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!
________________________________
Post a Comment