मनाच्या मंदिरी लाविली तुळस Lyrics | Manachya Mandiri Lavili Tulas
नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण मनाच्या मंदिरी लाविली तुळस Lyrics बघणार आहोत.
________________________________
मनाच्या मंदिरी लाविली तुळस Lyrics
मनाच्या मंदिरी लाविली तुळस
मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात || धृ ||
माझा विठू आहे विटेवरी उभा
कटेवरी हात त्याचे दिसे दिव्य शोभा
डोळे भरून पाहू या विठ्ठलाची मूर्त
मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात.. || १ ||
साधु संत मंडळी आले ग पंढरी
हरिनामाचा गजर करते चंद्रभागे तिरी
प्रेमभक्तीचा सूर गाऊ या सुरात
मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात.. || २ ||
हळदी कुंकू हुक्का वाहू या चरणाला
चंदनाची उटी लावूया हाताला
कस्तुरी टिळा हा शोभे हा भाळात
मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात..|| ३ ||
माय पित्याची सेवा बघून प्रभू झाले दंग
विट फेकूनी उभा राही परब्रम्ह एक
पंढरीचा राजा आहे दयावंत
मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात.. || ४ ||
दासी विनविते प्रभूच्या चरणाशी
जन्मोजन्मी येईल रे तुझ्या मी मंदिरी
एकच मागणे आहे देरे आशीर्वाद
मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात..|| ५ ||
* * * * *
________________________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
- भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे Lyrics
- विठ्ठलाचे रूप मंदिरी सुंदर Lyrics
- अशी पंढरी पंढरी विठुरायाची सोन्याची नगरी
- कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा विठ्ठला
________________________________
________________________________
Post a Comment