Header Ads

राम सीता निघाले वनाला Lyrics | Ram Sita Nighale Vanala



नमस्कार या पोस्टमध्ये आपण राम सीता निघाले वनाला Lyrics बघणार आहोत.
_____________________________

राम सीता निघाले वनाला Lyrics

राम सीता निघाले वनाला
लक्ष्मण आवरेना कुणाला
दशरथ राजा लोळे धरणीला
माता कैकेयीने हट्ट मांडीला || धृ ||

नको नको कैकेयी माझा बाळ चुकला नाही
कोण्या पदार्थाला कधी रुसला नाही
घर सोडून अंगण कधी पाहिले नाही
सांग सल्ला तुला कोणी दिला
वाचनामध्ये फसविले मला
दशरथ राजा लोळे धरणीला... || १ ||

चंद्र सूर्य परी बाळ माझे दोन्ही
सीता आहे पुत्र वधू गुलाबा वाणी
नको पाठवू ग भयान वनी
मामा गावी भरत गेला
आल्यावर काय सांगू त्याला
दशरथ राजा लोळे धरणीला... || २ ||

अडवा अडवा कुणी वनी राम निघाला
गाई म्हशी सारे गलबला उठला
डोळ्या आड पाहू आता कुठे रामाला
असा कसा काळ उभा झाला
दशरथ राजा लोळे धरणीला... || ३ ||

राम सीता सारखी जोडी मिळणार नाही
शबरी सारखी वाट कुणी बघणार नाही
एका जनार्दनी राम अवतारी आला
काय नेले सिद्धीला माझा राम राजा झाला
दशरथ राजा लोळे धरणीला..‌ || ४ ||

* * * * * *
____________________________

ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
____________________________


तर आज या पोस्टमध्ये आपण राम सीता निघाले वनाला Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!
____________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.