Header Ads

अंबाबाईचा उदो अंबाबाईचा Lyrics | Ambabaicha Udo Udo



नमस्कार या पोस्टमध्ये आपण अंबाबाईचा उदो अंबाबाईचा Lyrics बघणार आहोत.


सॉंग - अंबाबाईचा उदो अंबाबाईचा
लिरिक्स - वैभव देशमुख
सिंगर - सावनी रविंद्र
म्युझिक - विजय नारायण गावंडे


___________________________

अंबाबाईचा उदो अंबाबाईचा Lyrics

उदो उदो उदो उदो उदो‌...

अंबाबाईचा उदो अंबाबाईचा..(*४)
अंबाड्यात मांडीला तू गजरा जाईचा
सूर्यवंशी लखलखतो साज डोईचा
पार्वतीचं रूप तू अवतार कालीचा
मेळ तुझ्या ठायी आई भक्ती शक्तीचा
अंबाबाईचा उदो अंबाबाईचा...

चंद्र सूर्य तारे तुझ्या अंगठीचे खडे
तुझ्या रूपाचा उजेड अंबरी पडे
सात गणन पदर आई तुझ्या साडीचा
हिऱ्यावाणी झगमग तो रंग जरीचा..
अंबाबाईचा उदो अंबाबाईचा..(*२)

भक्तावर आलेला काळ सारीशी
चंड मूंड वधून तू विश्वतारीशी
देवांचे संकटही तू निवारीशी
होऊनिया काली रक्तबीज मारीशी
नाय नाटकरीची आई दैत्यशाहीचा
तिन्ही लोकी महिमा गाजं अंबाबाईचा
अंबाबाईचा उदो अंबाबाईचा....(*२)

बरसू दे कृपेचं सदा तुझ्या चांदणं
एवढंच आई तुझ्या पायी मागणं
नित्य राहू दे असाच हात डोईचा
माळीला तो भंडारा तुझ्या पायीचा
अंबाबाईचा उदो अंबाबाईचा.. (*२)

शैलपुत्री चंद्रघंटा ब्रह्मचारींनी कुश्मंडा
स्कंदमाता कात्यायनी 
कालरात्री महागौरी सिद्धीदात्री
दैवद्याची देवी आई जन्मदात्री तू ...
गाजं महिमा आईचा..

अंबाबाईचा उदो अंबाबाईचा...(*२)
हो आई तुळजाईचा उदो उदो‌.‌
आई यल्लमा चा उदो उदो...
आई सप्तशृंगी चा उदो उदो..
आई काळुबाईचा उदो उदो..
आई रेणुकाबाईचा उदो उदो..
आई रेणुकाबाईचा उदो उदो..
हे.. अंबाबाईचा उदो उदो...
हे अंबाबाईचा उदो अंबाबाईचा..(*६)

* * * * * * *
___________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇


___________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण अंबाबाईचा उदो अंबाबाईचा Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!

___________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.