अंबिका पदरात घे ग तू मला Lyrics | Ambika Padarat Ghe Ga Tu Mala
नमस्कार या पोस्टमध्ये आपण अंबिका पदरात घे ग तू मला Lyrics बघणार आहोत.
_________________________
🌸अंबिका पदरात घे ग तू मला Lyrics | Marathi 🌸
कसं ग सांगू मी तुला काहीच समजना मला
लेकराची माय द्यावी या ग बाळाला
अंबिका पदरात घे ग तू मला...|| १ ||
का ग रुसली अशी माझ्या संग बोल घडाघडा
नको वागू अशी नात्याला जणू गेला या तडा
आई रुसवा आता सोड माझ्या संग बोल गोड
जीव तुझ्या विना येडा पिसा ग झाला
अंबिका पदरात घे ग तू मला...|| २ ||
काय झाली माझी चूक मला सांग तू समजून
जीव पायावरती तुझ्या माझा ठेवीतो गहाण
गळा घालून या माळ आराधी तुझा बाळ
लेकराला का ग माय अंतर दिलं
अंबिका पदरात घे ग तू मला...|| ३ ||
तूच केलं होतं माझ्या जीवनाचं ग सोनं
आता तुझ्या विना नाही मला जगी दुसरं कोण
जरी झाला ग गुन्हा नाही होणार पुन्हा
बाळ गुरुनाथ हाक मारितो तुला..
अंबिका पदरात घे ग तू मला...|| ४ ||
⚜ ⚜ ⚜ ⚜ ⚜
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_________________________
आज या पोस्टमध्ये आपण अंबिका पदरात घे ग तू मला Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💙💙!!!!!!!
_________________________
Post a Comment