अंबा बसली वाघावरी Lyrics | Amba Basali Vaghavari Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण अंबा बसली वाघावरी Lyrics बघणार आहोत.
__________________________
अंबा बसली वाघावरी Lyrics | Marathi
मनी लागलीया असं मला होतो या ग भास
लागली जीवाला हुरहुरी
मला जायचं तुळजापुरी अन
अंबा बसली वाघावरी... || धृ ||
लगबगीने तयारी केली मी राऊळी जाण्याची
ओढ मला लागली अंबाबाईला पाहण्याची
मन माझं बसना बसना जाग्यावरी
मला जायचं तुळजापुरी.. || १ ||
शिंगारानं किती शोभून दिसते अंबाबाई
शीलांगर खेळण्याची झाली तिला घाई
माजी अंबाबाई साऱ्यांची कैवारी
मला जायचं तुळजापुरी...|| २ ||
पाहता रूप आईच माझी हरली सुद बुद
मुखी उद्गार आला आई राजा उदं उदं
ध्यान कार्तिकाचं आहे त्या लिखाणावरी
मला जायचं तुळजापुरी..|| ३ ||
❖ ❖ ❖ ❖ ❖
____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- कुटुंब माझं सुखात हाय अंबाबाई Lyrics
- अंबाबाई तुझा संबळ वाजला Lyrics
- माझी अंबा ग देवी अंबा ग Lyrics
- धुमधडाका झाला बाई तुळजापुरात Lyrics
__________________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💜💜💜 !!!!
__________________________
Post a Comment