कुटुंब माझं सुखात हाय अंबाबाई Lyrics | Kutumb Majh Sukhat Hay Ga Ambababi
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण कुटुंब माझं सुखात हाय अंबाबाई Lyrics बघणार आहोत.
___________________________
🌹कुटुंब माझं सुखात हाय अंबाबाई Lyrics 🌹
सासू-सासरा ननंद दिर
आले ग तुझ्या पायी
माझी मोठी जाऊ बाई
आली ग तुझ्या पायी
कुटुंब माझं सुखात हाय ग
आई ग अंबाबाई ..|| धृ ||
माझं कुटुंब आनंदी झालं
अंबा दिलंस तू वरदान
माझा दिर हाय भावाप्रमाणं
मोठी जाऊ बाई गूणवाण
सेवा आम्ही तुझीच करतो
तुळजाभवानी आई..
कुटुंब माझं सुखात हाय ग..|| 1 ||
आम्ही आलो गं भेटायाला
तुझ्या ग तुळजापुराला..
मान ओटीचा दिलाय तुला...
न मळवट कुंकवाने भरला
तू साऱ्या दुनियाची आई..
तुझीच आहे पुण्याई
कुटुंब माझं सुखात हाय ग..|| 2 ||
आई भल्या ग पहाटे वेळी
आम्ही गातो तूझी भूपाळी
पूजा दिनरात करती नी
माझ्या घरची ही मंडळी
खातो आम्ही भाजी भाकरी
पर्वा आम्हा कशाची नाही
कुटुंब माझं सुखात हाय ग..||3 ||
सासू-सासरा ननंद दिर आले ग तुझ्या पायी ..
कुटुंब माझं सुखात हाय ग अंबाबाई..||
* * * * *
____________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- धुमधडाका झाला बाई तुळजापुरात Lyrics
- येई अंबे भजनाला धावून ये ग Lyrics
- आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा Lyrics
- पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात Lyrics
____________________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण कुटुंब माझं सुखात हाय अंबाबाई Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!!!!
____________________________
Post a Comment