Header Ads

येई अंबे भजनाला धावून ये ग Lyrics | Yei Ambe Bhajanala Dhavun Ye Ga



नमस्कार🙏🙏🙏या पोस्टमध्ये आपण येई अंबे भजनाला धावून ये ग Lyrics बघणार आहोत.
___________________________

🌷🌷येई अंबे भजनाला धावून ये ग Lyrics 🌷🌷

येई अंबे भजनाला धावून ये ग
सुंदर साडी सावरीत ये ग
चंदेरी काठ त्याचा आवरित ये ग
येई अंबे भजनाला धावून ये ग.. || धृ ||

लावीन तुजला कुमकुम भाळी
नेसवीन तुला साडी चोळी
सौंदर्याचा मोर पिसारा फुलवीत ये ग
येई अंबे भजनाला धावून ये ग.. || १ ||

गायन मंजुळ गीत तुझे ग
पैंजण खुळखुळ वाजवीत ये ग
ठेक्यावरी ताल माझ्या ठुमकत ये ग
येई अंबे भजनाला धावून ये ग.. || २ ||

वाहीन तुजला हार तुरे ग
चमेली गुलाब चाफा गुंफुनी सारे
बसून सिंहावर डौलत ये ग
येई अंबे भजनाला धावून ये ग.. || ३ ||

तूच तूकाई तुळजापूरची
माय भवानी शोभे वाघावरती
काजळ नयनी तांबूल ओठी लावून ये ग
येई अंबे भजनाला धावून ये ग.. || ४ ||

* * * * * *
___________________________


💚ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
___________________________

तर आज या पोस्टमध्ये आपण येई अंबे भजनाला धावून ये ग Lyrics बघितले‌.

📜📜पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
___________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.