मन माझे रंगले भजनात Lyrics | Man Majhe Ramale Bhajanat
नमस्कार या पोस्टमध्ये आपण मन माझे रंगले भजनात Lyrics बघणार आहोत.
____________________________
मन माझे रंगले भजनात Lyrics | Marathi
थोडी फार सेवा घ्यावी पदरात |
मन माझे रमले भजनात... || धृ ||
हार गजरे नाही कामाचे
देव आहे पुलाच्या पाकळीत
मन माझे रमले भजनात... || १ ||
पुरणपोळी नाही कामाची
देव आहे चटणी भाकरीत
मन माझे रमले भजनात... || २ ||
गादी बिछाने नाही कामाचे
देव आहे फाटक्या गोधडीत
मन माझे रमले भजनात... || ३ ||
माडी बंगला नाही कामाचे
देव आहे तनाच्या झोपडीत
मन माझे रमले भजनात... || ४ ||
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
देव आहे सर्वांच्या हृदयात
मन माझे रमले भजनात... || ५ ||
* * * * *
____________________________
- नको गर्व करू दादा श्रीमंती पायी Lyrics
- काय मागु आनंता तुला लाखमोलाचा जन्म दिला Lyrics
- आई नाही बाप नाही आधार दे ना कोणी Lyrics
____________________________
तर आज आपण मन माझे रंगले भजनात Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!! 🙏🙏🙏🙏
____________________________
Post a Comment