नको गर्व करू दादा श्रीमंती पायी Lyrics | Nako Garv Karu Dada Shrimantipayi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण नको गर्व करू दादा श्रीमंती पायी Lyrics बघणार आहोत.
__________________________________
नको गर्व करू दादा श्रीमंती पायी Lyrics
नको गर्व करू दादा श्रीमंती पायी
दुबळी बहीण काही मागणार नाही || धृ ||
जन्म घेतला हे दोघे एका माय पोटी
गेले माझ्या घरी मी झाली ताटा तूटी
बालपणाची ही आठवण विसरणार नाही
दुबळी बहीण काही मागणार नाही || १ ||
मला वाटतं रे दादा माझ्या घरी यावे
चरणी मीठ भाकर खाऊन जावे
धन दौलत तुझी मला लागणार नाही
दुबळी बहीण काही मागणार नाही || २ ||
तुझी आठवण येते प्रत्येक सणाला
रुसणार नाही तुझ्या चोळीच्या खणाला
आई बाप गेले दोन्ही माझे कोणी नाही
दुबळी बहीण काही मागणार नाही || ३ ||
मेरे दादा तुझी बहिणाबाई
भक्ती भावा विना जगी मुक्ती नाही
बहिणाबाईचे ऐकून घ्या काही
दुबळी बहीण काही मागणार नाही || ४ ||
* * * * * *
________________________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇👇
- गर्वाने वागू नको भल्या माणसा Lyrics
- मोजता येत नाही जगाच्या मापन Lyrics
- जीवाला विसावा दुखी संसारातून Lyrics
__________________________________
आज या पोस्टमध्ये आपण नको गर्व करू दादा श्रीमंती पायी Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!
__________________________________
Post a Comment