राधा जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला Lyrics | Radha Jaras Deshil Ka Tujh Dahi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण राधा जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला Lyrics बघणार आहोत.
______________________________
राधा जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला Lyrics
ही गवळ्याची राधा कशी आलीया रंगाला |
राधा जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला.. || धृ ||
तुझी नाजूक कंबर कसा हलतोय झुंबर |
तुला पाहिल्यापासून मला वाटते हुरहुर ||
ही गवळ्याची राधा कशी आलीया रंगाला .. || १ ||
तुझा गोरा गोरा अंग गोपाळ झाले सारे दंग |
होशील का ग माझी राणी येशील का ग माझ्या संग ||
ही गवळ्याची राधा कशी आलीया रंगाला .. || २ ||
या कृष्णाची माया नको घालू राधे वाया |
तो सोडून कामधंदा ये कृष्णाला भेटाया ||
ही गवळ्याची राधा कशी आलीया रंगाला .. || ३ ||
तुला पाहिलं मी निरखून गेलं मन माझं हरपून |
एका जनार्दनी राधे कृष्ण गेलाया भूलून ||
ही गवळ्याची राधा कशी आलीया रंगाला .. || ४ ||
* * * * * * *
____________________________
या गवळणी पण नक्की वाचा 👇👇👇
- कान्हावीण राधा गवळण
- राधीके भेट तू देना मला गवळण
- चल ना राधे माझ्या गावाला गवळण
- चुंबळ मोत्याची वर पाण्याचा घडा
- आल्या पाच गवळणी Lyrics
_________________________________
या पोस्टमध्ये आपण राधा जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
__________________________________
Post a Comment