का ग अंबाबाई तू ध्यानात मनात Lyrics | Ambabai Bhajan Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण का ग अंबाबाई तू ध्यानात मनात Lyrics बघणार आहोत.
________________________
का ग अंबाबाई तू ध्यानात मनात Lyrics | Marathi
का ग अंबाबाई तू ध्यानात मनात
जागा देते तूला माझ्या हृदयात..|| धृ ||
माझ्या अंबाबाईला हिरवी हिरवी साडी
आणि अंगी चोळी भरजरी...
का ग अंबाबाई तू ध्यानात मनात...|| १ ||
माझ्या अंबाबाईला हिरव्या हिरव्या बांगड्या
आणि हाती शोभती वाकी आणि तोड्या
का ग अंबाबाई तू ध्यानात मनात.. || २ ||
अंबाबाईच्या हाती कमळ त्रिशूल
सावरते अंबा पैठणीचा घोळ
का ग अंबाबाई तू ध्यानात मनात... || ३ ||
अंबाबाईच्या कंठी कवड्यांची माळ
आई तुझा ग मी घालते गोंधळ
का ग अंबाबाई तू ध्यानात मनात... || ४ ||
तुझ्या गं वाचून चैन पडेना जीवा
आई तुझा सहवास सदैव हवा
का ग अंबाबाई तू ध्यानात मनात... || ५ ||
* * * * * *
________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- आई ग अंबे माते तुझा सोनियाचा झुबा Lyrics
- पैंजणाचा नाद आला गोड कानी ग
- नवरात्रीनिमित्त स्पेशल देवीची भजने
आज या पोस्टमध्ये आपण का ग अंबाबाई तू ध्यानात मनात Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛 !!!!!
__________________________
Post a Comment