Header Ads

कवड्या लागल्या लागल्या आंब्याच्या झाडाला Lyrics | Kavdya Lagalya Lagalya Ambyachya Jhadala



नमस्कार या पोस्टमध्ये आपण कवड्या लागल्या लागल्या आंब्याच्या झाडाला Lyrics बघणार आहोत.
________________________

🌹कवड्या लागल्या लागल्या आंब्याच्या झाडाला Lyrics🌹

काय म्हणावे येड्या माईच्या अशाच अचंब्याला
चमत्कार अद्भुत दावला येरमाळ्याला
कवड्या लागल्या लागल्या आंब्याच्या झाडाला
ग कवड्या लागल्या लागल्या आंब्याच्या झाडाला.. || धृ ||

खरी भक्ती ज्याची असते त्याला चमत्कार दिसे
त्या भक्ताच्या अंतरी नित्य येडामाय वसे
आमराईच्या वनात येता येडू विसाव्याला
ग कवड्या लागल्या लागल्या आंब्याच्या झाडाला.. || १ ||

पालखीचा सोहळा तिचा गुण्याच्या रानात ग
चुनखडी प्रकट होते काळ्याभोर मातीत ग
पाच दिवस भेट तिची होई भाविकाला
ग कवड्या लागल्या लागल्या आंब्याच्या झाडाला.. || २ ||

येडामाई रूप तुझं पाहण्याचा योग आला
त्या आबाजी पाटलाला तूच दृष्टांत दिला
ठाण तुझं मानलं तू शिखर डोंगराला
ग कवड्या लागल्या लागल्या आंब्याच्या झाडाला.. || ३ ||

कथा सांगतो ही त्रेता युगाची
शक्ती प्रकट झाली.. जिने दाखविले सत्व आपले
येडाई ती झाली.. ऐका तर मग..
प्रभू रामा पुढे आली पार्वती
रूप घेऊन सीतामाई पार्वती
प्रभू रामाने ओळखली पार्वती
तु काय येडी आहे माते पार्वती
झाली येडीची येडाई पार्वती...

आली आबाजीच्या भेटी येडाई
आली भक्ताला तारण्या येडाई
आली संकटे झेलाया येडाई
आली हाकेला धावून येडाई
आली होऊनी वरदान येडाई
आम्हा लेकरांची माय येडाई
रानपाखरांची माय येडाई
कवड्या लागल्या लागल्या आंब्याच्या झाडाला.. || ३ ||

|| आई राजं उदो उदो
करमाळ्याचा येडूसरीचा उदो उदो ||

* * * * * * *
______________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण कवड्या लागल्या लागल्या आंब्याच्या झाडाला Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💚💚 !!!!!!

________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.