Header Ads

लखाबाईची पालखी निघाली Lyrics | Lakhabaichi Palakhi Nighali



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण लखाबाईची पालखी निघाली Lyrics बघणार आहोत.

______________________

लखाबाईची पालखी निघाली Lyrics

हलगी वाजे वाकी वाजे
बघाया गर्दी झाली अहो..
बघाया गर्दी झाली..
या आखाड महिन्यात ग..
माझ्या लखाबाई ची पालखी निघाली..|| धृ ||

आईचं लिंबा वाणी डोळं
गळ्यात बांगड्यांची माळ
रूप लखाबाईच लय अक्राळ विक्राळ
पालखीत बसून कशी हसतीया.. गोड गाली
आई हस्तीया गोड गोड गाली..
या आखाड महिन्यात ग..|| १ ||

आई मोठ्या ग मनाची हो लईच गुणाची
इच्छा पुरी करते साऱ्या भक्तजनाची
माघारी ती धाडत नाही कुणालाच हातानं खाली..
अहो कुणालाच हाताना खाली..
या आखाड महिन्यात ग..|| २ ||

शोभे रेड्यावरती किती तिच्या कोरडा तो हाती
वीर दंड दंडात भुतावळ तिला भीती
जरी मरी तीच खरी आहे हो महाकाली
या आखाड महिन्यात ग..|| ३ ||

दारी पोतराज आला मदान वाहा त्याला
सारे लखाबाई च्या नावानं चांगभलं बोला
आनंदानं कमलेशान लेखनी तुझी ग केली
आई लेक मी तुझी गं केली
या आखाड महिन्यात ग..|| ४ ||

☙ ☙ ☙ ☙ ☙
______________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
______________________


👀आज या पोस्टमध्ये आपण लखाबाईची पालखी निघाली Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛💛!!!!!

______________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.