Header Ads

नऊ महिने नऊ दिवसाने Song Lyrics | Shubhangi Kedar



नमस्कार या पोस्टमध्ये आपण नऊ महिने नऊ दिवसाने Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग नऊ महिने नऊ दिवसाने
लिरिक्स - उमेश जाधव
सिंगर - शुभांगी केदार
म्युझिक - सुजित विराज


______________________

नऊ महिने नऊ दिवसाने Song Lyrics | Marathi

नऊ महिने नऊ दिवसाने
जग बघण्या झाली घाई
वंशाच्या दिव्या पायी.. (*२)
नको पणती विझवू आई
नऊ महिने नऊ दिवसाने...

उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणारं
मुलगी आहे म्हणूनी सारे नाक मोडणार
माझ्या चिमुकल्या कानांना तुझी कुजबुज ऐकू येई..
वंशाच्या दिव्यापाई
नको पणती विझवू आई
नऊ महिने नऊ दिवसाने...
अविचाराने तू माझा करू नको घात..
जन्मभर ठेवीन आई तुला मी सुखात

तूच माझं नशीब आई
तूच माझी सटवाई
वंशाच्या दिव्यापाई
नको पणती विझवू आई
नऊ महिने नऊ दिवसाने...

मुला परी मुलीलाही मिळो जन्मानंद
तूच भ्रूण हत्येला घाल पाय बंद
कारणे मारणे आता
तुझ्या हाती सर्व काही
वंशाच्या दिव्या पायी
नको पणती विझू आई...

* * * * * *
_________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
______________________


आज या पोस्टमध्ये आपण नऊ महिने नऊ दिवसाने Song Lyrics बघितले.

📃📃पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💙💙💙 !!!!!!

______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.