रडू नको बाळा अंबा घराला येते Lyrics | Radu Nako Bala Amba Gharala Yete
नमस्कार या पोस्टमध्ये आपण रडू नको बाळा अंबा घराला येते Lyrics बघणार आहोत.
______________________
👦रडू नको बाळा अंबा घराला येते Lyrics | Marathi 👦
रडू नको बाळा आंबा घराला येते
घराला येते आई दर्शन देते.. || धृ ||
पहिल्या रातीला विघ्न दूर करिते
दूर करिते सुख समृद्धी देते ... || १ ||
दुसऱ्या रातीला आई शक्ती ती देते
शक्ती ती देते शक्तीवाण बनविते... || २ ||
तिसऱ्या रातीला आई बुद्धी ती देते
बुद्धी ती देते बुद्धिवान बनविते..|| ३ ||
चौथ्या रातीला आई विद्या ती देते
विद्या ती देते अन विद्यावान बनविते.. || ४ ||
पाचव्या रातीला आई ज्ञान हो देते
ज्ञान हो देते कीर्तिवान बनविते.. || ५ ||
सहाव्या राशीला आई माया लावीते
माया लाविते आम्हा प्रेम करिते .. || ६ |
सातव्या रातीला रोग दूर करीते...
दूर करिते काया निरोगी ठेविते.. || ७ ||
आठव्या रातीला धनसंपत्ती देते
संपत्ती देते धनवान बनविते ..|| ८ ||
नव्या रातीला इच्छा पूर्ण करीते
इच्छा पूर्ण करिते अनुभूती दाविते ..|| ९ ||
श्रीकृष्णाच्या डोईवरी हात ठेवीते
हात ठेवीचे उदंड आयुष्य देते .. || १० ||
☘ ☘ ☘ ☘ ☘
__________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- अंबा बसली वाघावरी Lyrics
- माझी अंबा ग देवी अंबा ग Lyrics
- माय भवानी आंबिकेला कुंकू लावूया Lyrics
- येई अंबे भजनाला धावून ये ग Lyrics
_________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण रडू नको बाळा अंबा घराला येते Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
__________________________
Post a Comment