आसूड बडवित आली लखाबाई Lyrics | Asud Badvit Ali Lakhabai
नमस्कार या पोस्टमध्ये आपण आसूड बडवित आली लखाबाई Lyrics बघणार आहोत.
_________________________
🌸आसूड बडवित आली लखाबाई Lyrics🌸
शेंदुराचा भारी टिळा लिंबाची माळ गळा
ऐका हो तिची नवलाई
आसूड बडवीत बडवित आली लखाबाई .. || धृ ||
पोतराज वाकी वाजवितो
गजर चांगभलं गाजवितो
सुवासिनींनो या ग जरा
लखाबाई ची आरती करा
ब्रह्मांडाची माऊली ही..
आसूड बडवीत बडवित आली लखाबाई .. || १ ||
या देवीचं वरखेड गाव महालक्ष्मी हिच नाव
दंडात रामकडा मुखामध्ये पान विडा
दुबळ्यांची सावलीच ही
आसूड बडवीत बडवित आली लखाबाई .. || २ ||
आर कोणी म्हणे हिला मरीमाता
आपल्या साऱ्यांची हिला चिंता
आखाडाचा महिना आला
जाऊ मदत मागायला
कृपा करील माऊली ही
आसूड बडवीत बडवित आली लखाबाई .. || ३ ||
* * * * * *
_________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- मन माझे रंगले भजनात Lyrics
- आई अंबा जगदंबा दिवस निघाला नवा Lyrics
- Top 10 Navratri Bhajan Lyrics Marathi
- देवीचे भजन मराठी Lyrics
_________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण आसूड बडवित आली लखाबाई Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💙💙💙!!!!!!
_________________________
Post a Comment