Header Ads

नटून बसली येडामाय नागवेलीच्या पानात Lyrics | Natun Basali Yedamay



नमस्कार या पोस्टमध्ये आपण नटून बसली येडामाय नागवेलीच्या पानात Lyrics बघणार आहोत.


सॉंग - नटून बसली येडामाय
लिरिक्स - कमलेश गायकवाड
सिंगर म्युझिक - आनंद शिंदे
म्युझिक लेबल - टी सिरीज

____________________

नटून बसली येडामाय नागवेलीच्या पानात Lyrics | Marathi


आई माझी येडी बावन खोडी
नाकात नथ चुडा हातात
झुमका डुलतोय कानात..
नटून बसली येडामाय
नागवेलीच्या पानात..|| धृ ||

बसली डोंगरावरी स्वर्गाची सुंदरी
जणू काय दिसते परी माझी येडू सरी..
हरून भान खेळती बाण
बकास सुन्याच्या रानात
नटून बसली येडामाय..|| १ ||

येडामाईचा थाट बघा चाले येरमाळ्यात
नगाऱ्याची सात पूजा होती गाभाऱ्यात
भक्ती भाव मुखात नाव
दर्शन देती क्षणात ..
नटून बसली येडामाय..|| २ ||

येडामाई च्या नावाने उदो उदो उदो उदो
गळ्यात आईच्या घालावी दोन पानांची माळ
पाच कवड्यांची माळ..
हे गळ्यात आईच्या घालावी दोन दर्शनी माळ
आईला दर्शनी माळ..

आई ग येडामाई तुझ्या माळला कवडी एक..
माळाला कवडी एक बाळू अंबाबाईचा लेक

आई ग येडामाई तुझ्या माळला कवड्या दोन
माळला कवड्या दोन येरमाळ्यात रमत मन

आई ग येडामाई तुझ्या माळला कवड्या तीन
माळला कवड्या तीन लखाई ठेवतीया ध्यान

आई ग येडामाई तुझ्या माळला कवड्या चार
माळला कवड्या चार खेळत काळुबाईच वारं

आई ग येडामाई तुझ्या माळला कवड्या पाच
माळला कवड्या पाच सोबती यल्लमाचा नाच..

साऱ्या जगाचा झालाय महादेव सत्तार
अनेक रुपांत देवी पार्वती अवतार
नटून बसली येडामाय...

* * * * * * *
______________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

___________________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण नटून बसली येडामाय नागवेलीच्या पानात Lyrics बघितले.

___________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.