असं वाटतं येडामाय वाऱ्या वाणी उडावं Lyrics | As Vatat Yedamay Varyavani Udaav
नमस्कार या पोस्टमध्ये आपण असं वाटतं येडामाय वाऱ्या वाणी उडावं Lyrics बघणार आहोत.
असं वाटतं येडामाय वाऱ्या वाणी उडावं Lyrics | Marathi
होतोय भास मला आवाज कानावरी..
घेऊन भरारी मी पाहीन येडेश्वरी..(*२)
आत वाटतय येडामाय वाऱ्या वाणी उडावं
हार बनवून तुझ्या गळ्यात पडावं
गळ्यात पडावं ग माय गळ्यात पडावं..||धृ ||
नव्हतं माहित माझ्या स्वप्नात आली
रामाच्या पारी माझी झोपच उडाली
जिकड पहावं तिकडं डोळ्यापुढे आली..
डोंगराला जाण्याची तयारी हो केली..
नको अंत ग पाहू दर्शन घडावं..
हार बनवून तुझ्या गळ्यात पडावं
गळ्यात पडावं ग माय गळ्यात पडावं|| १ ||
तुझ्या दरबारात माझं पडलं पाऊल
अंगावर आला काटा लागली चाहूल
भावाने भक्तीची वाहीन मी फुलं
चढतो मी पायरी माझ्या सार्थीक झालं..
गर्व अहंकार तुझ्या चरणी सोडावं..(*२)
हार बनवून तुझ्या गळ्यात पडावं
गळ्यात पडावं ग माय गळ्यात पडावं || २ ||
पण मन धन सारं चित्त राही नाही
चल ना माझ्या घरी आता लागू दे ग पाई
ताना भाऊ रणजीत भक्तीत बुडावं..(*२)
हार बनवून तुझ्या गळ्यात पडावं
गळ्यात पडावं ग माय गळ्यात पडावं || ३ ||
* * * * * *
ही भक्ती गीते पण नक्की बघा 👇👇👇👇
- माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई Lyrics
- आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई Lyrics
- गार डोंगराची हवा Lyrics
- चांदणं चांदणं झाली रात Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण असं वाटतं येडामाय वाऱ्या वाणी उडावं Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏
Post a Comment