गोंधळ मांडीला अंबाबाई गोंधळाला ये Lyrics | Chandan Kambale
नमस्कार या पोस्टमध्ये आपण गोंधळ मांडीला अंबाबाई गोंधळाला ये Lyrics बघणार आहोत.
सॉंग - आई गोंधळाला ये
लिरिक्स / म्युझिक / सिंगर - चंदन कांबळे
म्युझिक लेवल - सारेगामा इंडिया लिमिटेड
__________________________
🌷गोंधळ मांडीला अंबाबाई गोंधळाला ये Lyrics🌷
बोला आई राजा उदे उदे
मांडिली भक्तीन पूजा अंबाबाय
हे भरी लाल उगं तुझा अंबाबाय
हे धाव संकटाला माय तारुनी तु ने
अग अंबाबाय... गोंधळाला ये..
उधं उधं उधं उधं उधं उधं...
गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला ये...
गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला ये..
आई द्यावं असं देणं तुझं देणं भरभरून
कृपा करावी ग तुळजाभवानी
मी सुख समाधान तू यावं आनंदान..
दारी सोन्याच्या सोन पावलानं..
हे दिवटी पाझळली तुझी
अंधार घालव गं..
तुझ्या या बाळ गोपाळाला
सुखानं पालव गं...
टाकल्या बोलाला माय बरकत असू दे...
अगं अंबाबाय गोंधळाला ये..
उधं उधं उधं उधं उधं उधं...
गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला ये...
गोंधळ मांडीला ग अंबा गोंधळाला ये..
लेना ग कुकाचं तुझं लेणं ग कुकाचं
त्या कुकाच्या लेण्यांमध्ये ग माझे माय
मिळतं अनुकं सुखाचं
हे निरंतर चंदनाचा घमघमाट दे...
अगं येडामाय गोंधळाला ये..
अगं अंबाबाय गोंधळाला ये..
तुळजापूरची आई भवानी गोंधळाला ये ग..
गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला ये ग..
माहूर गडाची रेणुका तू गोंधळाला ये ग
गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला ये ग..
वनी गडाची सप्तशृंगी गोंधळाला ये ग...
गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला ये ग..
येरमाळ्याची येडामाई गोंधळाला ये ग..
गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला ये ग..
संदत्तीची यल्लमा तू गोंधळाला ये ग..
गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला ये ग..
अग मांढरगडचे काळुबाई गोंधळाला ये ग..
गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला ये ग..
पातर्डी ची मोहटादेवी गोंधळाला ये गं...
गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला ये ग..
आई कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला ये ग..
गोंधळ मांडीला ग आई गोंधळाला ये ग..
आई गोंधळाला ये ग..
* * * * * *
__________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________________
👀आज आपण गोंधळ मांडीला अंबाबाई गोंधळाला ये Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💜💜💜!!!!!
__________________________
Post a Comment