सुखा दुखाचा जिथे चालतो मायेचा बाजार Lyrics | Sukha Dukhacha Jithe Chalto Bajar
नमस्कार या पोस्टमध्ये आपण सुखा दुखाचा जिथे चालतो मायेचा बाजार Lyrics बघणार आहोत.
सुखा दुखाचा जिथे चालतो मायेचा बाजार Lyrics
सुखा दुखाचा जिथे
चालतो मायेचा बाजार
प्रभू मी अनुभवीला संसार || धृ ||
पै पाहुणे येती जाती
स्वार्थापुरता गौरव करती
चोरांचा बाजार..
प्रभू मी अनुभवीला संसार || १ ||
पै पै धन कमविले
शिल्लक पाहता काही न उरले
दारी उभा सावकार
प्रभू मी अनुभवीला संसार || २ ||
किती जिवाचा मित्र परंतु
संकटकाळी म्हणे कोण तू
चोरांचा बाजार...
प्रभू मी अनुभवीला संसार || ३ ||
संत तुकड्या म्हणे तू प्रभू माझा
करी माझा उद्धार
प्रभू मी अनुभवीला संसार || ४ ||
* * * * *
हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇
- पाखरा तुफान सुटला वारा अभंग
- एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर Lyrics
- एक तरी अंगी असू दे कला Lyrics
- तुकडोजी महाराज भजन संग्रह Lyrics
तर आज या पोस्टमध्ये आपण सुखा दुखाचा जिथे चालतो मायेचा बाजार Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment