एक तरी अंगी असू दे कला Lyrics | Sant Tukdoji Mahraj Abhang
नमस्कार या पोस्टमध्ये आपण एक तरी अंगी असू दे कला Lyrics बघणार आहोत.
एक तरी अंगी असू दे कला Lyrics | Marathi
एक तरी अंगी असू दे कला |
नाहीतर काय फुका जन्मला || १ ||
पशु पक्षांची योनी जयाची |
काय अपेक्षा धरा तयाची ||
परी तेही दाखवी चमक ती |
लोक पाहती त्यात गुणाला || २ ||
पोट भरावे सगळे म्हणती |
ऐसा जरी सगळ्यांची गणती ||
तरी गेली संस्कृतीची नीती |
सेवा धर्मची जाई लयाला || ३ ||
जगणे मरणे सगळे जाणे |
याने संपत नाही गाणे ||
पर उपकारा विनका जीने |
तुकड्या दास म्हणे सगळ्याला || ४ ||
- संत तुकडोजी महाराज
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇👇
- भक्ती करू का पोट भरू सांगा मी काय करू अभंग
- Tukdoji Baba Tumne Bharat Jaga Diya Tha Bhajan
- तुकडोजी महाराज भजन संग्रह Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण एक तरी अंगी असू दे कला Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment