Header Ads

तुकडोजी महाराज भजन संग्रह Lyrics | Tukadoji Maharaj Bhajan Sangrah


नमस्कार, या पोस्ट मध्ये तुम्हाला तुकडोजी महाराज भजन संग्रह Lyrics वाचायला मिळतील. तुकडोजी महाराज यांना " राष्ट्रसंत " म्हणून ओळखले जाते, कारण त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्यांनी सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता प्रबोधनाचे काम केले. त्यांचे पूर्ण नाव माणिक बेंडोजी इंगळे होते. त्यांचे गुरु आडकोजी महाराज यांनी हे नाव बदलून त्यांना तुकडोजी असे नाव दिले. त्यांनी मराठी आणि हिंदी या भाषांमधून काव्यरचना केली. चला तर मग बघूया तुकडोज महाराजांची भजने -



    १.करू नको निंदा कोणाची

    करू नको निंदा कोणाची
    अवगूण आपले अंतरी दिसती
    करू नको चिंता कोणाची....

    सरळ स्वभाव मृदूभाषा ही
    वापर मोलाची
    सर्वांशी संमतची राहणी...
    श्रद्धा संतांची..
    करू नको निंदा कोणाची....

    हाच वळो उपकार कराया
    हृदय कराया सहन संकटे
    तरीच कीर्ती साची
    करू नको निंदा कोणाची....

    ज्ञानामृत पाझरते जेथे,
    हाव धरी त्याची
    तुकड्या दास म्हणे रे साधक
    मिळे प्रभू स्वरूपाशी
    करू नको निंदा कोणाची....

    अवगूण आपले अंतरी दिसती
    करू नको चिंता कोणाची....
    करू नको चिंता कोणाची....

    २. हावऱ्या मना ऐकेना

    हावऱ्या मना ऐकेना
    मज गुरु भक्ती करू दे ना

    का करितो नश्वर चिंता
    सोडूनी सख्या भगवता
    गेले वय बघ आता आता
    उकले धन पुत्र कांता
    समजूनी बोध घेईना
    मज गुरु भक्ती करू दे ना

    हे बघ रे मोठी माडी
    आणि घरात जरीची साडी
    हातात रुपेरी काठी
    सेवेला नौकर पाठी
    हे जागीच पडले बघ ना
    मज गुरु भक्ती करू दे ना
    हावऱ्या मना ऐकेना
    मज गुरु भक्ती करू दे ना

    बांबूची चौकट करूनी
    दिले यास त्यास वरूनी
    बांधले जबर दोरीने
    तो पुन्हा न येवो म्हणूनी
    कोणास दया येईना
    मज गुरु भक्ती करू दे ना
    हावऱ्या मना ऐकेना
    मज गुरु भक्ती करू दे ना

    तुम कतील सरणी
    पाहती सगे नेत्रांनी
    जस आड येतसे कोणी
    उठले रे काका नाना
    मज गुरु भक्ती करू दे ना
    हावऱ्या मना ऐकेना
    मज गुरु भक्ती करू दे ना


    जे प्रभू शक्तीने न्हाले
    शडविकार त्यांचे मेले
    सेवेस्तव रिझले झिजले
    त्यांनीच मृत्यूला जिंकले
    अजूनही कीर्ती त्यांची ना
    मज गुरु भक्ती करू दे ना
    हावऱ्या मना ऐकेना
    मज गुरु भक्ती करू दे ना

    म्हणूनीच सांगतो नमुनी
    लाग रे गुरूच्या ध्यानी
    करशील या दुःखातूनी
    सुख पावसी जन्मोजन्मी
    तुकड्या म्हणे चल सोडी ना
    मज गुरु भक्ती करू दे ना
    हावऱ्या मना ऐकेना
    मज गुरु भक्ती करू दे ना


    ३. अरे रिकामा कशाला फिरतं

    अरे रिकामा कशाला फिरत
    तुझं गाव गावचं नाही का तिर्थ
    गावी राहती गरीब उपवासी
    अन्न सत्र लावितो सि काशी

    हे दान नव्हे का व्यर्थ
    तुझं गावचं नाही का तीर्थ
    अरे रिकामा कशाला फिरत
    तुझं गाव गावचं नाही का तिर्थ

    तुझ्या गावची शाळा ही मोडली
    धर्मशाळा तू शहरी का जोडली
    याने निघतो का जीवनात अर्थ
    तुझं गावचं नाही का तीर्थ
    अरे रिकामा कशाला फिरत
    तुझं गाव गावचं नाही का तिर्थ

    गावी गरिबांची घरटी ही मोडली
    तू तीर्थासी मंदिरे जोडली
    गाव गुंड करीती अनर्थ
    तुझं गावचं नाही का तीर्थ
    अरे रिकामा कशाला फिरत
    तुझं गाव गावचं नाही का तिर्थ

    आपल्या गावचे देवाचे करतो
    तुझी कीर्तीने मानाने तरतो
    दास तुकड्या म्हणे सार्थ
    तुझं गावचं नाही का तीर्थ
    अरे रिकामा कशाला फिरत
    तुझं गाव गावचं नाही का तिर्थ


    ४. मनी नाही भाव

    मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
    देव अशाने भेटायचं नाही रे
    देव बाजारचा भाजीपाला नाही रे
    देव बाजारचा भाजीपाला नाही रे

    मातीचा देव त्याला पाण्याचं भेव
    सोन्या चांदीचा देव त्याला चोराचे भेव
    लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव
    देव अशाने भेटायचं नाही रे
    देव बाजारचा भाजीपाला नाही रे

    देवाचं देवत्व नाही दगडात
    देवाचे देवाचे नाही लाकडात
    सोन्या चांदीत नाही देवाची मात
    देव अशाने भेटायचं नाही रे
    देव बाजारचा भाजीपाला नाही रे


    भाव तिथे देव ही संतांची वाणी
    आचारा वाचून मी पाहिलं का कोणी
    शब्दाच्या बोला ना शांती नाही मनी
    देवाच्या भेटायचं नाही रे
    देव बाजारचा भाजीपाला नाही रे
    देव अशाने भेटायचं नाही रे
    देव बाजारचा भाजीपाला नाही रे

    देवाचं देवत्व आहे ठायी ठायी
    मी तू गेल्यावीन अनुभव नाही
    तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही
    देव अशाने भेटायचं नाही रे
    देव बाजारचा भाजीपाला नाही रे




    ५. करिता भेद असा का सगळा


    करिता भेद असा का सगळा
    बोलला भारत दाटूनी गळा

    सर्वची माझी भावंडे ही
    परस्परांच्या कामी सगळी
    मीच तूच मग का समजूनी
    दुखविता मन सारे सळसळा
    बोलला भारत दाटूनी गळा

    जरी भाषा ही भिन्न बोलली
    तरी का हृदये दावी जळली
    वस्तू जोवरी एकची असते
    तोवरी प्रेमाची का चळा
    बोलला भारत दाटूनी गळा

    उद्योगास्तव जाती समजल्या
    मानवतेसाठी नच उठल्या
    तुकड्या दास म्हणे राष्ट्रीयता,
    एकता मार्ग न हो पांगळा
    बोलला भारत दाटूनी गळा




    ६. एक तरी अंगी असू दे कला

    एक तरी अंगी असू दे कला
    नाही तर काय फुका जन्मला

    पशुपक्ष्यांची योनी जयांची
    काय अपेक्षा घरा तयांची
    परि तेही दाखवी चमक ती
    लोक पाहती त्याच गुणाला
    नाही तर काय फुका जन्मला

    एक तरी अंगी असू दे कला
    नाही तर काय फुका जन्मला

    पोट भरावे सगळे म्हणती
    एसी जरी सगळ्यांची गणती
    तरी गेली संस्कृतीची नीती
    सेवाधर्मची जायला
    नाही तर काय फुका जन्मला

    एक तरी अंगी असू दे कला
    नाही तर काय फुका जन्मला

    जगणे मरणे सगळे जाणे
    यातची संपत नाही गाणे
    पार उपकारा वीन का जीने
    तुकड्या दास म्हणे सगळ्याला
    नाही तर काय फुका जन्मला

    एक तरी अंगी असू दे कला
    नाही तर काय फुका जन्मला

    ७. कधी येशील मनमोहना

    कधी येशील मनमोहना
    पाहण्या भारत आपुला पुन्हा
    हि मधुर तुझी बासरी, ऐकू दे एकदा तरी
    करी प्रसन्न आमुच्या मना ,
    पाहण्या भारत आपुला पुन्हा
    कधी येशील मनमोहना
    पाहण्या भारत आपुला पुन्हा

    भरता ग्रहण लागले,
    अति गुलाम जण जाहले
    तोडण्याचे येई बंधना,
    पाहण्या भारत आपुला पुन्हा
    कधी येशील मनमोहना

    पाहण्या भारत आपुला पुन्हा

    ऐश्वर्य तुझ्या वेळीचे
    गोपाळ गोपीमेळीचे
    नच स्वपनी दिसे त्या कोणा
    पाहण्या भारत आपुला पुन्हा
    कधी येशील मनमोहना
    पाहण्या भारत आपुला पुन्हा

    तुकड्याची आस कर पुरी
    तू गरुड सावरी हरी
    ये धाव नंद नंदना
    पाहण्या भारत आपुला पुन्हा
    कधी येशील मनमोहना
    पाहण्या भारत आपुला पुन्हा

    ८. कुठ वारी करशील मौजा


    कुठ वारी करशील मौजा
    मग येती यमाच्या फौजा

    घनदारा सूट साथी, 
    सगळे राखतील दरवाजा
    अंत काळी देतील लोटुनी
    काढुनी घेती फाजा रे
    मग येती यमाच्या फौजा
    मग येती यमाच्या फौजा

    कुठ वारी करशील मौजा
    मग येती यमाच्या फौजा

    खाली हमाली पोटे
    सगळी आजची म्हणती राजा
    शेवट कोणी साथ करीना
    का भुलासी या साजा रे
    मग येती यमाच्या फौजा
    मग येती यमाच्या फौजा

    कुठ वारी करशील मौजा
    मग येती यमाच्या फौजा

    चालतीचे हे गोत पाहुणे
    आले आपुल्या काजा
    काज सोडूनि व्यर्थ भटकती,
    काळ वाजवी बाजा रे
    मग येती यमाच्या फौजा
    मग येती यमाच्या फौजा

    कुठ वारी करशील मौजा
    मग येती यमाच्या फौजा

    चौऱ्यांशीचा फेरा पडतो,
    कोण भोगी ताव आजा
    तुकड्या दास म्हणे भय काय मोठे
    भज भज सद्गुरू राजा रे
    मग येती यमाच्या फौजा
    मग येती यमाच्या फौजा

    कुठ वारी करशील मौजा
    मग येती यमाच्या फौजा

    ९. किती आनंदी आनंद


    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या
    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या

    राजसनी महाली सौख्ये कधी मिळाली
    ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या
    या झोपडीत माझ्या.....

    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या
    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या

    भूमीवरी पडावे ताऱयांकड़े पाहावे
    प्रभू नाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या,
    या झोपडीत माझ्या ....

    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या
    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या

    पहारे आणि तिजोऱ्या, त्यातुनी होती चोऱ्या,
    दाराशी नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या,
    या झोपडीत माझ्या ....

    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या
    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या

    जाता त्या महाला मज्जाव शब्द आला
    भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या,
    या झोपडीत माझ्या ....

    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या
    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या

    महाली मऊ बिछाने, कंदील शामदानें
    आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या,
    या झोपडीत माझ्या ....

    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या
    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या

    येता तरी सुखेया , जात तरी सुखे जा
    कोणावर न बोझा, या झोपडीत माझ्या,
    या झोपडीत माझ्या ....

    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या
    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या

    पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे,
    शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या,
    या झोपडीत माझ्या ....
    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या
    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या

    तुकड्या मती करावी, पायी तुझ्या नमावी
    मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या,
    या झोपडीत माझ्या ....
    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या
    किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या


    १०. मित्रा कर मैत्री त्यासी

    जो सत्यावीण शब्द न बोले सहाजही कोणाशी
    मित्रा कर मैत्री त्यासी ....

    सरळ बुद्धीची सहनशीलता, 
    सरळ बुद्धीची वागणूक ज्याची
    वागणूक ज्याची .... आपुले दूख न वदे कुणाला
    आपुले दूख न वदे कुणाला, चिंता इतरांची
    मित्रा कर मैत्री त्यासी ....
    मित्रा कर मैत्री त्यासी ....

    चरित्र निर्मळ, राहणी साधी
    निंदी न कवणासी, दिनचर्या सततची योग्य ती
    सततची योग्य ती , हाव न मानाची
    मित्रा कर मैत्री त्यासी ....
    मित्रा कर मैत्री त्यासी ....

    हीन दिनांची प्रगती करण्या, कमाल निष्ठेची
    कमाल निष्ठेची .... तुकड्या दास म्हणे तरशील तू
    कीर्ती जरी गासी ....
    मित्रा कर मैत्री त्यासी ....
    मित्रा कर मैत्री त्यासी ....

    जो सत्यावीण शब्द न बोले सहाजही कोणाशी
    मित्रा कर मैत्री त्यासी ....
    मित्रा कर मैत्री त्यासी ....
    मित्रा कर मैत्री त्यासी ....
    मित्रा कर मैत्री त्यासी ....





    तर आज या पोस्ट मध्ये आपण तुकडोजी महाराज भजन संग्रह Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.

    हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!

    1 टिप्पणी:

    Blogger द्वारे प्रायोजित.