Header Ads

Abhang Marathi Lyrics | मराठी अभंग संग्रह


नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये तुम्हाला Abhang Marathi Lyrics वाचायला मिळतील. इथे तुम्हाला वेगवेगळे अभंग मराठीमधून वाचायला मिळतील.



     गजानना गजानना गणराया

    गजानना गजानना गणराया
    मुखाने गाऊ या मोरया || धृ ||

    फळे फुले वाहूया पूजन करूया
    लाडू मोदकांचा नैवेद्य दावूया
    भक्ती भवाने गणेशाला वंदू या
    मुखाने गाऊ या मोरया || १ ||

    हे मोरेश्वरा आहे विघ्नहरा
    गुण किती वर्णू तुझे लंबोदरा
    चौदा विद्येचा देवा असे तु पाथा
    मुखाने गाऊ या मोरया || २ ||

    देव देवतांच्या हे महाराजा
    नाम तुझे राहो सदा मुखी माझ्या
    सारे मिळून गणपतीचा घोष करूया
    मुखाने गाऊ या मोरया || ३ ||

    ☘ ☘ ☘

     देव माझा विठू सावळा

    देव माझा विठू सावळा
    माळ त्याची माझीया गळा .... || धृ ||

    विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भुवरी,
    भिमाच्या काठी डुले भक्तीचा मेळा ||१||

    साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर
    कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा ||२||

    भजनात विठू डोलतो कीर्तनी विठू नाचतो
    रंगुनी जाई पाहुनी भक्तीचा लळा||३||

    ☘ ☘ ☘

    नमो नमो तुज श्री गणराया

    नमो नमो तुज श्री गणराया
    बुद्धी द्यावी तुझे गुण गाया
    अंगी उटी शेंदुराची
    कंठी शोभे माळ मुक्ता फळाची

    जय घोष बोला मंगलमूर्ती मोरया || धृ ||
    उमा महेश्वराचा असे तू बालक
    भक्तांचा कैवारी दृष्टांचा काळ
    तुमची असू द्या हो आम्हावरी छाया ||१||

    प्रतिवर्षी घरोघरी पूजन चाले
    जिकडे पहावे तिकडे भक्त आनंदाने डोले
    जय घोष बोला गणपती बाप्पा मोरया ||२||

    विठ्ठल नाथाची असे विनवणी
    कृपा असू द्यावी पूर्ण करितो मी लेखणी
    बाळ आदिनाथ तव लागे पाया ||३||

    ☘ ☘ ☘

     दत्त दर्शनाला जायचं जायचं

    दत्त दर्शनाला जायचं जायचं
    आनंद पोटात माझ्या मावेना || धृ ||

    गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट
    या या डोळ्याची हौस पुरी होईना होईना ||१||

    रूप सावळे सुंदर गोजिरवाणी मनोहर
    या या नजरेचा आणि काही येईना ||२||

    रूती नाथ पांडुरंग दत्त गारुडी अभंग
    या भजनाची हौस पुरी होईना होईना ||३||

    नजरबंदीचा हा खेळ, खेळे सद्गुरू प्रेमळ
    खेळ खेळीता खेळ पुरा होईना ||४||

    ☘ ☘ ☘

     पाहताची होती दंग

    पाहताची होती दंग आज सर्व संत
    विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत || धृ ||

    युगे अठ्ठावीस उभा विठू विटेवरी
    धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी

    अनाथांचा नाथ हरी असे कृपावंत ||१||
    कुठली ती होती माती कोण तो कुंभार

    घडविता उभा राहे पहा विश्वंभर
    तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तीवंत ||२||

    पाहुनिया विटेवरी विठू भगवंत
    दत्ता म्हणे मन माझे होई तेथे शांत
    गुरुकृपे साधी याला मी आज हा सुपंथ ||३||

    ☘ ☘ ☘

     झाला महार पंढरीनाथा


    झाला महार पंढरीनाथा |
    काय सांगू देवाची मात ||

    नेसली मलिन चीघोटी |
    घेतली हातामध्ये काठी ||

    घोंगडी टाकिली पाठी |
    करी जोहार दरबारात ||

    मुंडा शातं बांधिली चिठ्ठी |
    फेकीतो दुरुनी जगजेठी ||

    दामाजीने विकली जी कोठी |
    त्यांचे दाम घ्यावे पदरात ||

    खळखळा ओतिला मोहरा |
    त्याची मोजून पावती करा ||

    ढिगा बघून चमकल्या नजरा |
    शहा झाली बोटं तोंडात ||

    ☘ ☘ ☘

     हा देवांचा देव गणपती

    हा देवांचा देव गणपती
    सर्वाहूनी वेगळा
    वाहतो दुर्वाकूर कोवळा || धृ ||

    सिद्धिविनायक तू हेरंबा,
    मंगलदायक तू आरंभ
    चिंतामणी तू जय सुखदाता,
    विशाल देही वैराग्याचा
    रंग तुझा सोवळा ...||१||

    पशा कुंशकरी विघ्नराया,
    उभय करावी देशी अभया
    अन्नब्रह्मपरि मोदक माया,
    तुझ्या कृपेने मुका बोलतो
    चालतसे पांगळा..||२||

    गज मस्तक तू असीम बुद्धी
    रिद्धी सिद्धी ची समृद्धी
    साहित्याची अमृतसिद्धी
    प्रथम पाटीवर तुझा गणेशा
    ओम कार गिरवला. .... ||३||

    ☘ ☘ ☘

    टाळ बोले चिपळीला

    टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग
    देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ||धृ ||

    दरबारी आले रंग आणि राव
    झाले एकरूप नाही भेदभाव
    गाऊ नाचू सारे हो,
    होऊनी नि: संग. ||१||

    जनसेवे पायी काया झिजवावी
    घाव सोसूनिया मनेरी रिझवावी
    ताल देऊनी या बोलतो मृदंग ||२||

    ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई
    एक एक खांब वारकरी होईल
    कैलासीचा नाथ झाला पांडुरंग ||३||

    -जगदीश खेबुडकर

    ☘ ☘ ☘

     सकळ मंगळ निधी

    सकळ मंगळ निधी,
    श्री विठ्ठलांचे नाम आधी || धृ ||

    म्हण म्हण का रे म्हण का रे जना
    श्री विठ्ठलांचे नाम आधी || १ ||

    पतित पावन साचे
    श्री विठ्ठलांचे नाम आधी || २ ||

    बाप रखुमादेवी वरून साचे
    श्री विठ्ठलांचे नाम आधी || ३ ||

    ☘ ☘ ☘

     भक्ती वाचून मुक्तीची मज जडली

    भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी
    विठ्ठल मीच खरा अपराधी || धृ ||

    ज्ञानेशाचे अमृत अनुभव,
    अनुकंपाचे नेपत्री आसव
    स्वप्न तरल ते नकळ शैषव
    विले त्यांत कधी विठ्ठला || १ ||

    संत तुक्याची अभंगवाणी,
    इंद्रायणीचे निर्मळ पाणी
    मीच बुडविला दृष्ट यौवनी
    करूणेचा निधी विठ्ठला || २ ||

    सरले शिश्रनाव स्वच्छंदीपणा,
    नुरले यौवान उरले मी पण
    परि न रंगले प्रमप्त हे मन,
    तुझ्या चिंतनी कधी विठ्ठला || ३ ||

    ☘ ☘ ☘

    माती सांगे कुंभाराला

    माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी
    तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी || धृ ||

    मला फिरविशी तू चाकावर
    घट मातीचे घडवी सुंदर
    लग्न मंडपी कधी असे मी,
    कधी शवा पाशी || १ ||

    वीर धुरंदर आले, गेले
    पायी माझ्या इथे झोपले
    कूब्जा अथवा मोहक युवती,
    अंति मजपाशी ||२ ||

    गर्वाने का ताठ राहसी ?
    भाग्य कशाला उगा नासशी ?
    तुझ्या ललाटी अखेर लिहिले
    आहे मिलन माझ्याशी || ३ ||

    ☘ ☘ ☘

     घातली रांगोळी गुलालाची

    घातली रांगोळी गुलालाची,
    स्वारी आली गणरायाची || धृ ||

    दूर्वा पुष्प बहुप्रिय माळा
    हार रत्नांचा शोभला || १ ||

    नैवेद्य मोदकाचा केला
    प्रसाद वाटूनी काला केला || २ ||

    दास म्हणे श्री गणराया,
    मस्त हे तुमच्या पाया || ३ ||

    ☘ ☘ ☘




    हे पण नक्की वाचा 👇👇👇👇


    तर आज आपण या पोस्ट मध्ये Abhang Marathi Lyrics बघितले. अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी ला पुन्हा भेट नक्की द्या.

    हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏


    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.