एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर Lyrics | Sant Tukdoji Maharaj Abhang
नमस्कार या पोस्टमध्ये आपण एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर Lyrics बघणार आहोत.
एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर Lyrics | Marathi
एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर |
येथेच कर येथेच भर लपशील कोठवर ||१||
जे जे हवे खरेदी कर अरे बाजार हा खुला |
नीतीचे घे तराजू अन सौदा सुखाचा कर||२||
चित्तात शुद्धता जशी वाचेत सभ्यता |
वरचनी ही लिनता किती भुलली रे आजवर||३||
शुद्धीवरी ये माणसा बिघडू नको असा |
बिघडले ते संपले उरले देठभर || ४ ||
बुडत्या परी तू वाहू नको डोहात श्रीधरा |
थोडा घसरला पाय जर रडशील जन्मभर||५||
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
* * * *
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- पंढरीच्या लोका किती मारू हाका अभंग
- देव नटला नानापरी अभंग
- तू माऊली हुनी मायाळ अभंग मराठी Lyrics
- आज आले रे घरी गणपती अभंग Lyrics
आज या पोस्टमध्ये आपण एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment