पिरतीचा करंट बसलाया Lyrics | Sonali Sonawane
नमस्कार या पोस्टमध्ये आपण पिरतीचा करंट बसलाया Lyrics बघणार आहोत.
सॉंग - पिरतीचा करंट बसलाया
लिरिक्स - निलेश कटके
सिंगर - सोनाली सोनवणे
म्युझिक - प्रसाद शिंदे
पिरतीचा करंट बसलाया Lyrics | Marathi
हे रंग महाली आज या घडी
आली नार देखणी...
कोर चंद्राची नटली भाळी
आली बघा स्वर्गाची सुंदरी...
आली बघा स्वर्गाची सुंदरी...
फिरती पाकोळी जणू जाळ मासोळी
हाती मी घावायची नाही
खुलयाली ज्वानी मी दर्याची राणी
काळजात मावायची नाय...
नजरेच्या टापूत धरलया तुम्ही राया
मी झाले तुमचीच हाय...
बेहाल झालं या जीव ह्यो हरलया
त्याला हाय उमजना काय ?
पाव्हणं... पाव्हणं मिशीत जरा तुम्ही हसलंया
तुमच्या पिरतीचा करंट बसलाया
पाव्हणं मिशीत जरा तुम्ही हसलंया
तुमच्या पिरतीचा करंट बसलाया
लखलख चमचम चंदेरी काया..
कन्नाच्या खुशीत सुगंधी फाया
नाकाच्या नथीचा अजब तोरा
ऐवज माझा मी हवाली केला..
माझ्याजवळ तुम्ही बसा ना
थोडं गूलू गूलू गाली हसाना
तुमचा सहवत नाही दुरावा
असं एक टक तुम्ही बघा ना
ओ पाव्हणं..
तुमच्या नादानं जीव पार झूरलाया
तुमच्या पिरतीचा करंट बसलाया
पाव्हणं मिशीत जरा तुम्ही हसलंया
तुमच्या पिरतीचा करंट बसलाया
धारदार नजरेचा आरपार सुरा
उरामध्ये झगमग पिरमाचा पारा
चढतोय ज्वानीचा भन्नाट पारा
घालू मी बाई त्याला कसा ग आळा
खाऊ नका हो तुम्ही आता भाव
कोरल काळजावर तुमचंच नाव
भले आले हो कितीतरी साव
त्यांनी माझ्यावर लावीलाय डाव
अहो पाव्हणं..
तिर इश्क का उरी खुळ गुतलाया
तुमच्या पिरतीचा करंट बसलाया
पाव्हणं मिशीत जरा तुम्ही हसलंया
तुमच्या पिरतीचा करंट बसलाया...
* * * * *
हे गीत पण नक्की वाचा 👇👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण पिरतीचा करंट बसलाया Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
Post a Comment