Header Ads

गणपती राया पडते मी पाया Lyrics | Ganapati Raya Padatw Mi Paya



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण गणपती राया पडते मी पाया Lyrics 👀 बघणार आहोत.
__________________________

गणपती राया पडते मी पाया Lyrics | Marathi

गणपती राया पडते मी पाया
काय मागू मागणं रे
काय मागु मागणं रे देवा ...
काय मागू मागणं रे ...||धृ ||

तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा
आशीर्वाद राहू दे रे
हेच माझं सांगणं रे देवा ....
हेच माझं सांगणं रे
गणपती राया पडते मी पाया रे ....||१ ||

नाही नवस सायास केले,
कधी यात्रेला नाही गेले
परी मनात मी पुजियेले
तुझ्या भक्तीने आता सुखाने
भरले घर अंगण रे
हेच माझं सांगणं रे देवा ...
हेच माझं सांगणं रे
गणपती राया पडते मी पाया रे ..||२ ||

मोह सुखाचा नाही सोस,
तुझ्या नावाचा लागे ध्यास
आता अंतरी उरली आस
माझ्या कपाळी अखंड राहो
सौभाग्य चांदणं रे
हेच माझं सांगणं रे देवा ..
हेच माझं सांगणं रे
गणपती राया पडते मी पाया रे ..||३ ||

आता मागणं मागू कशाला
माझा संसार सोन्याचा झाला
सुख लाभलं माझ्या जीवाला
गुण भरदार माझी लेकरं
कर त्यांची राखणं रे
हेच माझं मागणं रे देवा ....
हेच माझं मागणं रे..|| ४ ||

तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा
तुझ्या दयेचा तुझ्या कृपेचा
आशीर्वाद राहू दे रे
हेच माझं सांगणं रे देवा...
हेच माझं सांगणं रे
हेच माझं सांगणं रे..||५ ||

गणपती राया पडते मी पाया
गणपती राया पडते मी पाया
काय मागू मागणं रे
हेच माझं मागणं रे देवा ...
हेच माझं मागणं रे
गणपती राया पडते मी पाया रे ...

❖ ❖ ❖ ❖ ❖
____________________


✅हि गीते पण नक्की वाचा 👇👇👇

__________________________

👀तर आज या पोस्ट यामध्ये आपण गणपती राया पडते मी पाया Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 💛💛🙏🙏🙏!!!!!!

__________________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.