गणपतीची मराठी गाणी Lyrics | Ganpatichi Marathi Gani Lyrics
या पोस्ट मध्ये तुम्हाला गणपतीची मराठी गाणी Lyrics वाचायला मिळतील. गणपतीची जुनी तसेच नवीन खूप गाजलेली गीते मी इथे शेअर केली आहेत. चला तर मग बघूया गणपतीच्या गाण्यांचे बोल -
गणपतीची मराठी गाणी Lyrics | Marathi
🌸🌸 🙏🙏🙏 🙆🙆🙆 🙏🙏🙏 🌸🌸
1. रचिल्या ऋषीमुनींनी
रचिल्या ऋषीमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत
वरदायका गणेशा महा महदाशया सुरेषा
वरदायका गणेशा महा महदाशया सुरेषा
का वेध लावीसी तू हे रंभ एकदंत
रचिल्या ऋषीमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत
येसी जाळातुनी तू , कोणा कळे न हेतू
येसी जाळातुनी तू , कोणा कळे न हेतू
अजूनही भ्रमात सारे योगी मुनी महंत
रचिल्या ऋषीमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत
मढ मंदिरात येते जे जे अनन्य भक्त
मढ मंदिरात येते जे जे अनन्य भक्त
ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत
रचिल्या ऋषीमुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत
- वसंत बापट
⌘ ⌘ ⌘
2. गणराज रंगी नाचतो
गणराज रंगी नाचतो
गणराज रंगी नाचतो , नाचतो
पायी घागऱ्या करिती रुणझुण ..(2 times)
नाद स्वर्गी पोचतो
गणराज रंगी नाचतो नाचतो
गणराज रंगी नाचतो नाचतो
कटी पितांबर कसून भरजरी ..(2 times)
बाल गजानन नर्तनास करी
तुंदिल तनु तरि चपला साजिरी ..(2 times)
लावण्ये साजतो
गणराज रंगी नाचतो नाचतो
गणराज रंगी नाचतो नाचतो
नारद तुंबरु करिती गायन ..(2 times)
करी शारदा वीणा वादन
ब्रम्हा धरितो ताल ही रंगून
गणराज रंगी नाचतो नाचतो ..(2 times)
गणराज रंगी नाचतो नाचतो
देवसभा घनदाट बैसली
नृत्य गायने मने हर्षली
गौरी संगे स्वये सदाशिव
शिशु कौतुक पाहतो
गणराज रंगी नाचतो नाचतो
गणराज रंगी नाचतो नाचतो
- शांता शेळके
⌘ ⌘ ⌘
3. झुळ झुळ वाहे
झुळझुळ वाहे पुण्य जळाचा
निर्जर हो निर्जर हो
श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर
ओझर हो ओझर हो
झुळझुळ वाहे पुण्य जळाचा
निर्जर हो निर्जर हो
श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर
ओझर हो ओझर हो
गणरायाला विघ्ना सूर ये
शरण जिथे शरण तिथे ..(2 times)
भक्तजनांना भय दावील का
मरण तिथे मरण तिथे
हे विघ्नेश्वर चरण दयेचे
पाझर हो पाझर हो
श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर
ओझर हो ओझर हो
कृष्ण शिळेचा मूषक धावे
दाराशी दाराशी ..(2 times)
तैशा पळते भक्तांच्या, संकट राशी संकट राशी
भव्य चिरंते मंदिर हेचिर
सुंदर हो सुंदर हो
श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर
ओझर हो ओझर हो
श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर
ओझर हो ओझर हो
झुळझुळ वाहे पुण्य जळाचा
निर्जर हो निर्जर हो
श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर
ओझर हो ओझर हो
झुळझुळ वाहे पुण्य जळाचा
निर्जर हो निर्जर हो
श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर
ओझर हो ओझर हो
⌘ ⌘ ⌘
4. बंधू येईल माहेरी
बंधू येईल माहेरी न्यायाला ..(2 times)
गौरी गणपतीच्या सणाला
गाडी घुंगराची येईल न्यायाला ..(2 times)
गौरी गणपतीच्या सणाला
सण वर्षाचा गण गौरी गणपती
सण वर्षाचा गणपती ..(2 times)
इथे येईल आनंदाला भरती
येई आनंदाला भरती ..(2 times)
साडी चोळी नवी
हो ओ ओ ओ ओ ओ ....
साडी चोळी नवीन नेसून मिरवायला ...
गौरी गणपतीच्या सणाला ..
बंधू येईल माहेरी न्यायाला
गौरी गणपतीच्या सणाला
इथं जमतील लाडक्या मैतरणी
इथे लाडक्या मैतरणी ..(2 times)
फेर धरतील भवती साऱ्याजणी
फेर धरतील साऱ्याजणी ..(2 times)
मला विनवणी करतील नाचायला ..(2 times)
गौरी गणपतीच्या सणाला
ओ बंधू येईल न्यायाला , गौरी गणपतीच्या सणाला
माहेरीच या घुमत मन पाखरू
हे घुमत मन पाखरू ..(2 times)
माया बापाची ओढ कशी आवरू
ही ओढ कशी आवरू ..(2 times)
गोड कौतुक करवूनी घ्यायाला
गौरी गणपतीच्या सणाला
बंधू येईल माहेरी न्यायाला
गौरी गणपतीच्या सणाला
गाडी घुंगराची येईल न्यायाला
गौरी गणपतीच्या सणाला
गौरी गणपतीच्या सणाला
गौरी गणपतीच्या सणाला
- विलास जैतापकर
⌘ ⌘ ⌘
5. यावे यावे गणराया
यावे यावे हो गणराया , मला माहेराला न्याया ..(2 times)
आला गौरीचा सण, मोहरल मन, माहेराला जाया ..(2 times)
यावे यावे हो गणराया , मला माहेराला न्याया ..(2 times)
मी सासुरवाशीन करती
कोंड्या मांड्याचा संसार करती
मी सासुरवाशीन करती
कोंड्या मांड्याचा संसार करती
गेलं जिंदगी अशीच पुरती
तुझा आधार मंगलमूर्ती
गेलं जिंदगी अशीच पुरती
तुझा आधार मंगलमूर्ती
नको संपत्ती धन, दे समाधान
ठेवा तुझी छाया
यावे यावे हो गणराया , मला माहेराला न्याया
जरी प्रेमळ माझे सासर, मुला बाळांनी भरलं घर ..(2 times)
माझं माहेर राहील दूर, कुठे मनामध्ये काहूर
आता दुरावली नाती, हरवली गोती
देरे तुझी माया
आता दुरावली नाती, हरवली गोती
देरे तुझी माया
यावे यावे हो गणराया , मला माहेराला न्याया
यावे यावे हो गणराया , मला माहेराला न्याया
साद कावळा घालितो दारी
गळा उबाळा दाटतो भारी
माझ्या बापाचे आठव सारी
⌘ ⌘ ⌘
6. गजानना श्री गणराया
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ..(2 times)
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया
गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया ..(2 times)
सिंदूर चर्चित ढवळे अंग ..(2 times)
चंदन उटी खूलवी रंग
बघता मानस होतो दंग, होतो दंग
जीव जडला चरणी तुझिया आधी वंदू तुझं मोरया
गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया ..(2 times)
गौरी तनया भालचंद्रा ..(2 times)
देवा कृपेचा तू समुद्रा तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा करूनागारा
अवघी विघ्ने नेसी विनया
आधी वंदू तुज मोरया
गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया
⌘ ⌘ ⌘
7. रमा माधवाचे जिथे
रमा माधवांचे जिथे चित्त लागे
जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे
चला थेऊराला चला जाऊया
गणेशा प्रति आरती गाऊया
चला थेऊराला चला जाऊया
गणेशा प्रति आरती गाऊया
जिथे मोरया मूर्ती पद्मासनात
दिसे वाम शुंडा नी मुद्रा निवांत
जिथे मोरया मूर्ती पद्मासनात
दिसे वाम शुंडा नी मुद्रा निवांत
असा भक्त चिंतामणी पाहूया ..(2 times)
गणेशा प्रति आरती गाऊया
चला थेऊराला चला जाऊया
गणेशा प्रति आरती गाऊया
बघे देव प्राची वरी सूर्यबिंबा
तया पाहते कौतुके माय अंबा
बघे देव प्राची वरी सूर्यबिंबा
तया पाहते कौतुके माय अंबा
पदी पद्म त्याच्या चला पाहूया ..(2 times)
गणेशा प्रति आरती गाऊया
चला थेऊराला चला जाऊया
गणेशा प्रति आरती गाऊया
चला थेऊराला चला जाऊया
गणेशा प्रति आरती गाऊया
रमा माधवांचे जिथे चित्त लागे
जिथे सत्य चिंतामणी नित्य जागे
⌘ ⌘ ⌘
8. झाला हो गाजा वाजा
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
हे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
झाला हो गाजा वाजा नाद भिडे गगनाला
सन गौरी गणपतीचा आला
झाला हो गाजावाजा सण गौरी गणपतीचा आला
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
ढोल ताशाच्या संगती बँड बाजा वाजतो
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
सन चतुर्थीचा कसा बघा गाजतो
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
देवा लंबोदर आला पितांबर शोभतो
श्री सुवर्णाचा तो मुकुटही शोभतो
धरतीवरी भक्ता घरी आनंद झाला
सन गौरी गणपतीचा आला
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
या पावसाच्या पडती रिमझिम रिमझिम धारा
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
शालू हिरवा त्याला निसर्ग नटला सारा
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
ठाई ठाई सुखाचा झुळझुळ वाहे वारा
आज मंगलमय हा दिन होई होई साजरा
भक्ती मूळ मुक्ती मिळे भक्तगणाला
झाला गो गाजा वाजा नाद भिडे गगनाला
सन गौरी गणपतीचा आला
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
⌘ ⌘ ⌘
9. ग बाई गणपतीचा
ग बाई ग गणपतीचा, देव माझा नवलाईचा ..(2 times)
इवले इवले पाय माझ्या गणेशाचे ..(2 times)
मोठे मोठे पोट माझ्या लंबोदराचे
इवले इवले पाय माझ्या गणेशाचे
मोठे मोठे पोट माझ्या लंबोदराचे
फुगत जाय बाई तोरा त्याचा
देव माझा नवलाईचा
ग बाई ग गणपतीचा, देव माझा नवलाईचा ..(2 times)
मोठे मोठे कान माझ्या गणेशाचे ..(2 times)
मोठे मोठे कान माझ्या गणेशाचे
छोटे छोटे डोळे माझ्या गजानन नाचे
लाडका बाळ पार्वतीचा
देव माझा नवलाई चा
ग बाई ग गणपतीचा, देव माझा नवलायचा ..(2 times)
सरळ मान माझ्या गणेशाची ..(2 times)
वाकडी सोंड माझ्या मोरयाची
सरळ मान माझ्या गणेशाची, वाकडी सोंड माझ्या मोरयाची
मोदक लाडू खाऊ त्याचा, देव माझा नवलाईचा
ग बाई ग गणपतीचा, देव माझा नवलाईचा ..(2 times)
⌘ ⌘ ⌘
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- Top 10 Ganpati Songs Lyrics In Marathi
- Amchya Pappani Ganpati Anala Lyrics
- Shree Ganeshay Dheemahi Lyrics
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment