Top 10 Ganpati Songs Lyrics In Marathi | टॉप १० गणपतीची गानी
नमस्कार मित्रानो, स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics 🙏🙏🙏🙏वर !!!!!!! आज आपण या पोस्ट मध्ये Ganpati Songs Lyrics In Marathi बघणार आहोत. गणपतीचे गोंडस, सुंदर रूप कोणाला नाही आवडत ? बाप्पाची काही प्रसिद्ध अशी गाणी आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत. मला खात्री आहे हि गाणी तुमची पण फेव्हरेट असतील. चला तर मग वेळ न घालवता बघूया गणपतीच्या गाण्यांचे बोल -
तर मित्रानो , आज आपण Ganpati Songs Lyrics In Marathi बघितले. तुम्हाला हि गाणी कशी वाटली ते मला कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन असतील ते पण सांगा. मला ते जाणून घ्यायला नक्की आवडेल. अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या . तुम्हाला कोणत्या गण्याचे लिरिक्स हवेअसतील तर ते पण सांगा .
पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
![]() |
Ganpati Songs Lyrics In Marathi |
🙏🙏🙏🙏🙏🙏
प्रथम तुला वंदितो लिरिक्स
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया
विघ्नविनाशक, गुणिजन पालक, दुरित तिमिर हारका
सुखकारक तू, दुःख विदारक, तूच तुझ्यासारखा
वक्रतुंड ब्रम्हांडनायका, विनायका प्रभुराया
सिद्धिविनायक तूच अनंता, शिवात्मजा मंगला
सिंदूर वदना, विद्याधिशा, गणाधिपा वत्सला
तुच ईश्वरा साह्य करावे, हा भवसिंधु तराया
गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसुता
चिन्तामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता
रिद्धि सिद्धीच्या वरा दयाळा, देई कृपेची छाया
प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया
❖ ❖ ❖ ❖
ओमकार स्वरूपा
ओमकार स्वरूपा .....(3 times)
आ आ आ ....
तुज नमो.....(3 times)
ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था
ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा तुजं नमो
तुज नमो.....(3 times)
ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था ..(2 times)
अनाथांच्या नाथा तुजं नमो
तुज नमो.....(3 times)
नमो मायबापा गुरुकृपा घना,
थोडी या बंधना माया मोहा
मोहजाळ माझे कोण निरशील
तुजविण दयाळा सद्गुरुराया
तुज नमो.....(3 times)
तुज नमो, तुज नमो
तुज नमो.....(3 times)
ओमकार स्वरूपा सद्गुरू समर्था ..(2 times)
अनाथांच्या नाथा तुजं नमो
तुज नमो.....(3 times)
सद्गुरु राया माझा आनंद सागर,
त्रैलोक्य आधार गुरुराव
त्रैलोक्या आधार गुरुराव ...(2 times)
आ आ आ....
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
आ आ आ आ... आ आ आ आ...
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश,
ज्पुयाढे उदास चंद्र रवी
यापुढे उदास चंद्र रवी. ...(2 times)
रवी शशी अग्नी
नेनती जया रूपा
रवी शशी अग्नी
स्वप्रकाश रूपा .. नेने वेद ...(2 times)
तुज नमो ...(2 times)
स्वप्रकाश रूपा तुज नमो
तुज नमो.....(3 times)
एका जनार्दनी गुरु परब्रम्हा ...(2 times)
तयाचे पै नाम सदा मुखी ...(2 times)
तुज नमो.....(2 times)
तयाचे पै नाम सदा मुखी
तुज नमो.....(3 times)
ओंकार स्वरूपा सद्गुरु स्वरूपा
अनाथांच्या नाथा, तुजं नमो
तुज नमो.....(3 times)
तुज नमो.....(3 times)
तुज नमो.....(3 times)
- संत एकनाथ
❖ ❖ ❖ ❖
अशी चिक मोत्याची माळ
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
या चिक माळेला
रेशमी बावशार दोरा ग
माऊ रेशमाच्या दोऱ्यात
नौरंगी माळ ओविली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
अशा चिक माळेला
हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ
गणपतीला ग घातली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
गोऱ्या गणपतीला फुलून
माळ शोभली ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
त्याने गोड हासुनी
मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन
गणराया ला ग
त्याचा आशीर्वाद ने
करू सुरुवात शुभ करायला ग
अशी चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
चिक मोत्याची माळ
होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपती चा गोंडा
चौरंगी लाल बावटा ग
❖ ❖ ❖ ❖
तूच सुखकर्ता तूच दुखहरता
तूच सुखकर्ता तूच दुखहरता अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षान एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्ष, घ्यावा संसाराचा परामर्ष
पुर्या वर्षाची सार्या दुखाची, वाचावी कशी मी गाथा
बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
नाव काढू नको तान्दुळाचे , केले मोदक लाल गव्हाचे
बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
आली कशी पहा आज वेळ, कसा बसावा खर्चाचा मेळ
प्रसादाला दूध आणी केळ,सार्या प्रसादाची केली भेळ
गुण गाइन आणी राहीन, द्यावा आशिर्वाद बाप्पा
❖ ❖ ❖ ❖
माझ्या गणान घुंगरू हरवलं
माझ्या गणान घुंगरू हरवलं
गौरीला घावल ....(2 times )
माझ्या गणान घुंगरू हरवलं
गौरीला घावल ....
एका वर्षानं आपलं दर्शन,
गणान गौरीला दावल
एका वरसान आपलं दर्शन,
गणान गौरीला दावल ...
हा...
गणा माझा होता तांडवात दंग
नाही गौरीनेही केला
त्याचा नाच भंग ....(2 times )
छम छम छन छन ....(2 times )
चढता असा हा रंग
वाऱ्यासंग वाज टाळ मृदंग
हे हे हे....वाऱ्यासंग वाज टाळ मृदंग
एकटक ध्यान तिनं त्याच्यावर लावलं..(2 times )
मन गौरीचा त्या माऊलीचा अहो हरकावलं
माझ्या गणान घुंगरू हरवलं
गौरीला घावल .... हा .. ....(2 times )
गनराज राही बा सर्वा ठाई ....(2 times )
येई वरसानं अवनीत ती गौरी माई ....(2 times )
डोळे भरूनी निरखून पाही
पाऊली घुंगरू नाही
पद सोभाया त्याचं ती त्याला देई ....(2 times )
गणाला नटवून माऊलीची जाई ..(2 times )
रुंद नाचान असं जोरान दूर भिरकावलं
माझ्या गणान घुंगरू हरवलं
गौरीला घावल .....
माझ्या गणान घुंगरू हरवलं
गौरीला घावल ....
एका वरसान आपलं दर्शन,
गणान गौरीला दावल ...
एका वरसान आपलं दर्शन,
गणान गौरीला दावल ...
माझ्या गजा तू रं
गजानना तु रं
तुला गऱ्हाण घालीतो माझं
माझ्या गणा तु र
नवसाला पाव र आज
माझा गणपती गणपती
करू त्याची आरती आरती आरती
तुला गऱ्हाण घालीतो माझं
माझ्या गणा तु र
नवसाला पाव र आज .... ....(4 times )
माझ्या गणान घुंगरू हरवलं
आज हो ...
- उत्तम कांबळे
❖ ❖ ❖ ❖
अष्टविनायका तुझा महिमा कसा
अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
गणपती पहिला गणपती
मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर
अकरा पायरी हो अकरा पायरी हो
नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर
शोभा साजरी हो शोभा साजरी हो
मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा
गणपती दुसरा गणपती
थेऊर गावचा चिंतामणी
कहाणी त्याची लई लई जुनी
काय सांगू आता काय सांगू
डाव्या सोंडेचं नवाल केलं साऱ्यांनी
ईस्तार ह्येचा केला थोरल्या पेशव्यांनी
रमाबाईला अमर केलं वृंदावनी
जो चिंता हरतो मनातली तो चिंतामणी
भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा
गणपती तिसरा गणपती
सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं
पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं
दैत्य मधु-कैटभानं गांजलं हे नगर
ईष्णूनारायण गाई गणपतीचा मंतर
राकूस मेलं नवाल झालं
टेकावरी देऊळ आलं
लांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखर
चंद्र सूर्य गरुडाची भवती कलाकुसर
मंडपात आरतीला खुशाल बसा
गणपती गणपती गं चौथा गणपती
बाई रांजणगावचा देव महागणपती
दहा सोंडा ईस हात जणू मूर्तीला म्हनती
गजा घालितो आसन डोळं भरून दर्शन
सूर्य फेकी मूर्तीवर येळ साधून किरण
किती गुणगान गावं किती करावी गणती
बाई रांजणगावचा देव महागणपती
पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा
गणपती पाचवा पाचवा गणपती
ओझरचा इघ्नेश्वर बाई लांब रुंद आहे मूर्ती
जडजवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती
डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा
तहानभूक हरती हो सारा बघून सोहळा
चारीबाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर
ओझरचा इघ्नेश्वर
इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा
गणपती सहावा गणपती
लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी
गणाची स्वारी तयाला गिरिजात्मज हे नाव
दगडमंदी कोरलाय भक्तिभाव
रमती इथं रंकासंगती राव हे जी
खडकांत केलं खोदकाम दगडांत मंडपी खांब
वाघ सिंह हत्ती लई मोठं, दगडांत भव्य मुखवट
गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा
अन् गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा
दगड माती रूप देवाचं लेण्याद्री जसा
सातवा गणपती राया
महड गावाची महसूर
वरद विनायकाचं तिथं एक मंदिर
मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर
घुमटाचा कळस सोनेरी
नक्षी नागाची कळसाच्या वरं
सपनात भक्ताला कळं
देवळाच्या मागं आहे तळं
मूर्ती गणाची पाण्यात मिळं
त्यानं बांधलं तिथं देऊळ
दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती
वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो
चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा
आठवा आठवा गणपती आठवा
पाली गावच्या बल्लाळेश्वरा
आदिदेव तू बुद्धिसागरा
स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख
सूर्यनारायण करी कौतुक
डाव्या सोंडेचे रूप साजिरे
कप्पाळ विशाळ डोळ्यांत हिरे
चिरेबंद या भक्कम भिंती
देवाच्या भक्तीला कशाची भीती
ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया
मोरया मोरया मयूरेश्वरा मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया
मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया
मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वरा मोरया
मोरया मोरया अष्टविनायक मोरया
❖ ❖ ❖ ❖
पार्वतीच्या बाळा
आला रे आला गणपती आला
आला रे आला गणपती आला
आला रे आला गणपती आला
आला रे आला गणपती आला
पार्वतीच्या बाळा,पायात वाळा
पार्वतीच्या बाळा,तुझ्या पायात वाळा
पुष्प हारांच्या घातलात माळा
ताशांचा आवाज ....
ताशांचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला
मोदक लाडू संगतीला घेऊ
भक्ती भावाने देवाला वाहु
गणरायच गुण गान गाऊ
डोळे भरून देवाला पाहु
देवाला पाहु,देवाला पाहु
देवाला पाहु,देवाला पाहु
गाव हा सारा रंगून गेला
गणपती माझा नाचत आला
ताशाचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला
वंदन माझे,तुझिया पाया
धरी शिरावर,कृपेची छाया
भक्ताला या दर्शन दयाया
देवा आधी देवा हे गणराया
देवा आधी देवा हे गणराया
देवा आधी देवा हे गणराया
लहान थोरा आनंद झाला
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला
ताशांचा आवाज तारारारा झाला र
गणपती माझा नाचत आला
फटाके उड़ती जय जय होय
❖ ❖ ❖ ❖
गणपती तू गुणपती तू
गणपती तू गुणपती तू
गणपती तू गुणपती तू नमन चरणी ईश्वरा
मी अडाणी भगत म्हणुनी दया करी या लेकरा
बोले तुणतुणं बोले हलगी
कडकड वाजे कडी ढोलकी
शाहीर कवनी जाई रमुनी, भरती जणू सूरसागरा
बहुजन मेळा थकला दमला
रसिक होउनी म्होरं जमला
कलाकृतीचा बागबगीचा, तरूतळी घेती आसरा
तू तर ठेवा सकल कलांचा
सुगंध तू तर शब्दफुलांचा
निराकार तू कलाकार मी, चुकभूल माझी सावरा
❖ ❖ ❖ ❖
नमो नमो तुज श्री गणराया
नमो नमो तुज श्री गणराया
बुद्धी द्यावी तुझे गुण गाया
अंगी उठी शेंदुराची
कंठी शोभे माळ मुक्ता फळाची
जय घोष बोला मंगलमूर्ती मोरया
उमा महेश्वराचा असे तू बालक
भक्तांचा कैवारी, दृष्टांचा काळ
तुमची असू द्या हो आम्हावरी छाया
प्रती वर्षी घरोघरी पूजन चाले
जिकडे पहावे तिकडे भक्त आनंदाने डोले
जय घोष बोला गणपती बाप्पा मोरया
विठ्ठल नाथाची असे विनवणी
कृपा असू द्यावी पूर्ण करितो मी लेखणी
बाळ आदिनाथ तव लागे पाया
❖ ❖ ❖ ❖
सुखकर्ता की दुःख हर्ता
सुखकर्ता की दुःख हर्ता विध्न विनाशक गणराया
गणपति बाप्पा मोर्या मंगल मूर्ति मोर्या
तुम्ही येता घरी आम्हा वाटे मजा
तुम्ही जाऊ नका आम्हा मिड़ते सजा
मोदक लाडू तुम्हाला द्या बुद्धि थोड़ी आम्हाला
सुखकर्ता की दुःख हर्ता विध्न विनाशक गणराया
तुमची चाले पूजा भजन किर्तन
आई बाबांचे ना होतसे भांडन
हात जोड़ता तुम्हाला शांति लाभों आम्हाला
सुखकर्ता की दुःख हर्ता विध्न विनाशक गणराया
आई बाबा विना ची मुले एकटी
उभे राहता तुम्ही त्यांचा पाठीशी
जाऊ नका तुम्ही गावाला चैन पड़े ना आम्हाला
सुखकर्ता की दुःख हर्ता विध्न विनाशक गणराया
❖ ❖ ❖ ❖
पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment