मंगळागौरीची गाणी Lyrics | Mangalagourichi Gani Lyrics Marathi
श्रावण महिन्यात अनेक व्रत वैकल्ये केली जातात. त्यातील एक असलेले व्रत म्हणजे मंगळागौरीचे व्रत !!! मंगळागौरीचे व्रत हे देवी पार्वतीचे व्रत आहे. नवविवाहित स्त्रिया लग्न झाल्यानंतर पाच वर्षे हे व्रत करतात. या वेळी अजुन्हि नवविवाहित स्त्रियांना बोलावतात. मंगळागौरीची दिवसा पूजा करतात आणि रात्री जागरण करतात. यावेळी विविध खेळ खेळण्याची पद्धत आहे. लहान मुलींपासून ते वयस्कर स्त्रिया या खेळांमध्ये उत्साहाने सहभागी होत असतात. या खेळाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. जसे झिम्मा, फेर, गोफ, गाठोडं, सूप, घागर घुमू दे, दिंड, टिपऱ्या इत्यादी हे खेळ मंगळागौरीच्या वेळी केल्या जाणाऱ्या जागरणाचा अविभाज्य भाग आहे दुसऱ्या दिवशी पूजेचे विसर्जन केले जाते या पोस्ट मध्ये आपण मंगळागौरीच्या वेळी म्हटल्या जाणारी गाणी मंगळागौरीची गाणी Lyrics बघणार आहोत -
मंगळागौरीची गाणी Lyrics | Marathi
✋✋💃💃💃✋✋
1. किस बाई किस
किस बाई किस दोडका किस
दोडक्याची फोड लागली गोड
आणिक तोड बाई आणिक तोड
किस बाई किस दोडका किस
दोडक्याचे पाणी कावळा रानी
खेळ ग सूने नेमते फनी
आठूड केलं गाठुड केलं
सासूच्या भयाणं संदीला ठेवलं
आता कसं करू बाई घूशीन नेलं
किस बाई किस दोडका किस
किस बाई किस दोडका किस
किस बाई किस दोडका किस
किस बाई किस दोडका किस
किस बाई किस दोडका किस
* * * *
2. नखुल्या बाई नखुल्या
नखुल्या बाई नखुल्या ,
चंदनाच्या टिकूल्या
एक टिकली उडाली,
गंगेत जाऊन बुडाली
गंगेला आला लोंढा,
भिजला माझा गोंडा
* * * *
3. राधा रुसली सुंदरी
राधा रुसली सुंदरी,
समजावीतो हरी की राधे चल ग मंदिरी
नथ ठेविली तबकात, कृष्णा लावीतो हात
माझ्याकडे ची शपथ
राधे घाल ग नाकात
राधा रुसली सुंदरी,
समजावीतो हरी की राधे चल ग मंदिरी
बांगड्या ठेवल्या तबकात कृष्णा लावीतो हात
माझ्याकडे ची शपथ
राधे घाल ग हातात
राधा रुसली सुंदरी,
समजावीतो हरी की राधे चल ग मंदिरी
पैंजण ठेविले तबकात, कृष्णा लावीतो हात
माझ्याकडे ची शपथ
राधे घाल ग पायात
राधा रुसली सुंदरी,
समजावीतो हरी की राधे चल ग मंदिरी
पाटल्या ठेविल्या तबकात, कृष्णा लावीतो हात
माझ्याकडे ची शपथ
राधे घाल ग हातात
राधा रुसली सुंदरी,
समजावीतो हरी की राधे चल ग मंदिरी
चपला हार ठेविला तबकात, कृष्णा लावीतो हात
माझ्याकडे ची शपथ
राधे घाल ग गळ्यात
राधा रुसली सुंदरी,
समजावीतो हरी की राधे चल ग मंदिरी
कंठी ठेवीले तबकात, कृष्णा लावीतो हात
माझ्याकडे ची शपथ
राधे घाल ग गळ्यात
राधा रुसली सुंदरी,
समजावीतो हरी की राधे चल ग मंदिरी
* * * *
4. किकीचं पान बाई
किकीच पान बाई कीकी कीकी
सुंदर माझा सुसू
आल्या ग बाई पुजारीणी पुजारीणी
कापूस घ्या ग पिंजारणी पिंजरानी
कापूस पडला सरकीचा सरकीचा
पाऊस पडला मोत्यांचा मोत्यांचा
किकीच पान बाई कीकी कीकी
सुंदर माझा सु सू
* * * *
5. एक भुई सारवू (बस फुगडी )
एक भुई सारवू
पाच खडे मांडू मांडू
एक खडा मोठा मोठा
सई आली पोटा पोटा
सईच्या कानी बुगड्या बुगड्या
आम्ही खेळू फुगड्या फुगड्या
अस्स पाखरू चांगलं चांगलं
वेशीला नेऊन टांगलं चांगलं
कोण गाव नगरी नगरी
भवताचे डगरी डगरी
काट्याची कुलप कुलप
मोत्याची झुलत झुलप
झुई फूई झुई फूई झुई फूई झुई फूई
झुई फूई झुई फूई झुई फूई झुई फूई
* * * *
6. गोफ विणू
गोफ विणू का गोफ विणू
अर्ध्या रात्री गोफ विणू
गरे घ्या गरे पोटाला बरे
नखा येईल त्याची म्हातारी मरे
मेली तर मेली कटकट गेली
संसाराला मोकळीक झाली
गोफ विनू का गोफ विनू
अर्ध्या रात्री गोफ विणू
* * * *
7. चिक्कन सुपारी फोडून दे
चिक्कन सुपारी फोडून दे सई फोडून दे
लाल गुडी तोडून दे सई तोडून दे
चिक्कन सुपारी फोडून दे सई फोडून दे
लाल गुडी तोडून दे सई तोडून दे
पतंग फुगडी ला लुंगा सई ला लूंगा
संयम थैया खेळूंगा सई खेळूंगा
* * * *
8. सालम सालकी
सालम सालकी तुझी माझी पालकी
पालकीत बसुनी खोबरं किसू
चल चल राधे बनात ग
चाफ्याचे फुल माझ्या कानात ग
सालम सालकी तुझी माझी पालकी
बगडा फु बाई बगडा फु
गेले होते राणी फुल माझ्या कानी
बगडा फु बाई बगडा फु
* * * *
9. दंड फुगडी
दंड फुगडी दंडाची
बाई माझ्या दिराची
अस्सा दीर ने चुका
खोबऱ्याचा कुटूका
अस्स खोबरं गोड गोड
जिभेला आला फोड फोड
ओळ काही फुटेना
दारचा मामा कुठे ना
एका हाताची फुगडी फुगडी
मामा घेतोय लुगडी लुगडी
मामा माझा गोरा गोरा
मामी माझी काळी काळी
शेवंतीची जाळी जाळी
जाळीला बाई खिडक्या खिडक्या
आम्ही लेकी लाडक्या लाडक्या
मामी गेली दळायला दळायला
पोरी आल्या खेळायला खेळायला
पोरी आल्या खेळायला खेळायला
पोरी आल्या खेळायला खेळायला
पोरी आल्या खेळायला खेळायला
पोरी आल्या खेळायला खेळायला
* * * *
10. अरंड्यावर करंडा
अरंड्यावर करंडा, करंड्यावर मोर
माझ्या संग फुगडी खेळते, चंद्राची कोर
आपण दोघी मैत्रिणी, अट्टीच्या अट्टीच्या
साड्या नेसू पट्टीच्या पट्टीच्या
ढगातून पडल्या मघा ग मघा ग
होन बाई होन रानोमाळी होन
माझ्या संग फुगडी खेळतेस आहेस तरी कोण ?
समुद्राची वाळू चाळणीने चाळू
आम्ही दोघी मैत्रिणी गंजीफा खेळू
आपण दोघी मैत्रिणी गळा घालू मिठी
गळा घालू मिठी
तडकीन मोडू जशी खोबऱ्याची वाटी
खोबऱ्याची वाटी .
फुगडी फुलते चवरी डूलते
पाठीवरली वेणी जशी नागिन डुलते
फुगडी खेळू दना दना
रुपये मोजू खणा खणा
रुपयाची सुकली जाऊ माझी धाकली
पान खायला शिकली
पानाचा देठ ग देठ ग
माझ्या फुगीची ऐट ग ऐट ग
* * * *
11. एक लिंबू झेलू
एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू
दोन लिंबू झेलू बाई तीन लिंबू झेलू
तीन लिंबू झेलू बाई चार लिंबू झेलू
चार लिंबू झेंडू बाई पाच लिंबू झेलू
पाच लिंबाचा पानोळा
माळ घालीती हनुमंता
हनुमंताची निळी खोडी
येता जाता कमळ तोडी
येता जाता कमळ तोडी
* * * *
हे पण वाचा 👇👇👇
तर आज आपण मंगळागौरीची गाणी Lyrics बघितली अधिक मराठी गाण्यांचे लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment