Header Ads

Mangalagaur Khelu Ya Lyrics in Marathi | बाई पण भारी देवा


नमस्कार मित्रांनो , या पोस्ट मध्ये आपण Mangalagaur Lyrics in Marathi बघणार आहोत .हे गान बाई पण भारी देवा या मराठी मूव्ही मधील आहे . या गाण्याला सावनी रविंद्र यांनी आवाज दिलेला आहे . चला तर मग बघूया " मंगळागौर खेळू या " या गाण्याचे बोल -


सॉन्ग - मंगळागौर खेळू या
मूव्ही - बाई पण भारी देवा
सिंगर - सावनी रविंद्र
म्यूज़िक - साई - पियूष
लिरिक्स- अदिति द्रविड़ & ट्रैडिशनल
म्युझिक लेबल - झी म्यूज़िक कपनी



Mangalagaur Lyrics | Marathi


जय देवी मंगळागौरी
जय देवी मंगळागौरी

ओवाळीन सोनिया ताटी
रत्नांचे दिवे
माळीकांच्या हाती
हीरेया मोती ज्योति
जय देवी मंगळागौरी
जय देवी मंगळागौरी

चल गं बाई खेळू या
मंगळागौर खेळू या
मंगळागौर खेळू या

गौराईचा खेळ बाई
आनंदात नाचू गाऊ
आनंदात खेळू या

मंगळागौर खेळू या
मंगळागौर खेळू या

हो हो, हो हो
हो हो, हो हो
हो हो, हो हो
हो हो, हो हो

पाणी लाटा गं, पाणी लाटा गं
पाणी लाटा, हो.. हो
सागर लाटा गं, सागर लाटा गं
सागर लाटा, हां.. हा

डोंगर माथ्यावर, डोंगर माथ्यावर
डोंगर माथा, हो.. हो
पाणी लाटा गं, पाणी लाटा गं
पाणी लाटा

दिंड्या मोड गं पोरी
दिंड्याची लांब दोरी

दिंड्याखाली कोण गं उभी
माय माऊली मी तर उभी
कोण्या गावाला गेली सांग दादा
कोण्या वाटेन गेली सांग दादा

दिंड्या मोड गं पोरी
दिंड्याची लांब दोरी

भोवर भेंडी भोवरा नाचे
भोवर भेंडी भोवरा नाचे
आठशे खिडक्या नऊशे दार
कुण्या वाटेन बा गेली किनार
तिचा सापडला चंद्रहार
तिचा सापडला चंद्रहार
हे..

सर सर गोविंदा येतो
मजवरी गुलाल फेकीतो
सर सर गोविंदा येतो
मजवरी गुलाल फेकीतो

या बाई झिम्मा नाचा या
आमच्या वेण्या घाला या

एल वेणी मोकळी
सोनियची साखळी
घडव घडव रे सोनारा
माणिक मोत्यांचा डोलारा

डोलाऱ्याला खिडक्या
आम्ही दोघी बहिणी लाडक्या
लाड सांगू बापाला
पैसे मागू काकाला

गौर बसली नाहाया
शंकर आले पहाया
शंकर आमचे मेहुणे
दोन दिसांचे पाहुणे
हुश...

चल गं बाई खेळू या
मंगळागौर खेळू या
मंगळागौर खेळू या

गौराईचा खेळ बाई
आनंदात नाचू गाऊ
आनंदात खेळू या

मंगळागौर खेळू या गं
मंगळागौर खेळू या

हो हो हो हो
हो हो हो

पिंगा गं पोरी, पिंगा गं पोरी
पिंगा गं पोरी, पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलवली
रात जागवली पोरी पिंगा

पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं
पोरी पिंगा गं, पिंगा

लेक माझी गं, सून तुझी गं
आहे देखणी गं, पोरी पिंगा
पिंगा गं पोरी, पिंगा गं पोरी
पिंगा गं पोरी, पिंगा

लेक माझा गं, जावई तुझा गं
आहे देखणा गं, पोरी पिंगा
पिंगा गं पोरी, पिंगा गं पोरी
पिंगा गं पोरी, पिंगा

हा हा

नाच गं घुमा, कशी मी नाचू
नाच गं घुमा, कशी मी नाचू
या गावचा, त्या गावचा
माळी नाही आला
वेळ नाही मला

कशी मी नाचू, नाच गं घुमा
कशी मी नाचू
या गावचा, त्या गावचा
शिंपी नाही आला
चोळी नाही मला
कशी मी नाचू

नाच गं घुमा, कशी मी नाचू
नाच गं घुमा, कशी मी नाचू
नाच गं घुमा, कशी मी नाचू

फू बाई फू फुगडी
चमचम करती या बुगडी
फू बाई फू फुगडी
चमचम करती या बुगडी



हे सुद्धा नक्की वाचा :


मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण Mangalagaur Lyrics in Marathi बघितले. नवीन मराठी गण्यांच्या लिरिक्स साठी पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा नक्की भेट द्या.

धन्यवाद 🙏🙏🙏🙏




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.