महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार Lyrics | Mahadevachya pindivar Vahe
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार Lyrics 👀बघणार आहोत.
________________________
🌹महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार Lyrics 🌹
महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार
पार्वती करिते सोळा सोमवार || धृ ||
शिंगणापूराला बाई मी जाते
बेल फूल घेऊनी शंभूला वाहते
महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार
पार्वती करिते सोळा सोमवार || १ ||
शिंगणापूराला जाते दही दूध घेते
शंभूला माझ्या अभिषेक करिते
महादेवाच्या पिंडीवरी धोत्र्याचा भार
पार्वती करिते सोळा सोमवार || २ ||
शिंगणापूराला पायी मी जाते
गोकर्णचे फुल शंभूला वाहते
महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार
पार्वती करिते सोळा सोमवार || ३ ||
शिंगणापूराला जाते कावड खांदी घेते
महादेवाच्या डोंगरावर पताकांचा भार
पार्वती करिते सोळा सोमवार || ४ ||
⸙ ⸙ ⸙ ⸙ ⸙ ⸙
________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
- भोलेनाथ अनमोल तू या जगात Lyrics
- हर हर महादेवा जय शिव शंकरा Lyrics
- पुढे पुढे चाले शंकरा मागे मागे पार्वती Lyrics
- पानामध्ये पान बहुमोलाचे Lyrics
________________________
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏💓💓 !!!!!!
________________________
Post a Comment