Header Ads

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात Lyrics | RatranDivasa Deva Tumachi Murti Dhyanat



नमस्कार या पोस्टमध्ये आपण रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात Lyrics बघणार आहोत.
_____________________________

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात Lyrics

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात
त्याचा लागेना अंत
स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त... || धृ ||

दिव्य स्वरूपी सदा टाकत होते अंगणात
अल्लख म्हणूनी भिक्षा मागत आले दारात
दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात
त्याचा लागे ना अंत
स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त... || १ ||

भगवी जोडी होती त्यांच्या डाव्या बगलेत
रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात
कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त
त्याचा लागे ना अंत
स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त... || २ ||

श्वानांची फौज होती त्यांच्या संगत
श्वानांना भाकर टाकत होते भगवंत
बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात
त्याचा लागे ना अंत
स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त... || ३ ||

भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत
खंडवांचा नाद घुमतो माझ्या कानात
गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात
त्याचा लागे ना अंत
स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त... || ४ ||

✶ ✶ ✶ ✶ ✶

_____________________________

✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
_____________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!🙏🙏🙏
_____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.